ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चांदा पब्लिक स्कूल येथे पूर्व प्राथमिक विभागात ‘मी अँड मम्मा’ मास्टरशेफ स्पर्धेचे आयोजन

स्पर्धेतुन आई व मूल यांच्यातील अतुट नात व समन्वय बघायला मिळाले

चांदा ब्लास्ट

पाककला म्हणजे चविष्ट, रूचकर आणि पोषक जेवन बनविण्याची कला होय. भारतात आपल्याला विविध प्रकारचे पाककलेतील आविष्कार बघायला मिळतात. आजकाल स्त्री, पुरूष दोघेही पाककलेमध्ये आपली रूची दाखवतात. स्वयंपाक घरातील काही वस्तू व पदार्थ तसेच सामग्री याविषयी विद्यार्थ्यांना माहिती असावी हा उद्देश लक्षात घेता चांदा पब्लिक स्कूल येथे पुर्व प्राथमिक विभागात आई व मूल यांची अग्निविरोधक स्वयंपाक (फायरलेस कुकींग) स्पर्धा घेण्यात आली.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रोफेसर अभय बुटले, डॉ. स्वप्नाली राजेश सुर, चैताली शेखर पप्पूलवार, तसेच आकांक्षा बुटले लाभले. या स्पर्धेतुन आई व मूल यांच्यातील अतुट नात व समन्वय बघायला मिळाले. कूकींग पार्टनर स्पर्धकांचे वेगवेगळे पदार्थ त्यातील नाविण्य व प्रस्तुतीकरण पाहुन उपस्थित अतिथी व शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका आम्रपाली पडोळे यांनी स्पर्धकांचे भरभरून कौतुक केले.

कार्यक्रमाचे सुत्र संचालन शिक्षिका मंजुश्री नवरखेले, रिना शाहा व मनिषा नागोसे यांनी तर आभार प्रदर्शन शिवानी पिंगे यांनी केले. उत्कृष्ठ विजेता व पारितोषिक वितरणाचे कार्य परिक्षकांनी केले ही स्पर्धा पूर्व प्राथमिक विभाग प्रमूख शिल्पा खांडरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्विरीत्या पार पाडली आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये