हिंदू युवकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्या
देऊळगाव राजा शहर बंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
सकल हिंदू समाजाच्या वतीने काढण्यात आला भव्य मोर्चा
देऊळगाव राजा शहरामध्ये काही दिवसापूर्वी मुस्लिम समाजातील युवकाने छत्रपती शिवाजी महाराज विषयी सोशल मीडियावर आक्षेपाहार्य पोस्ट केली होती. यासंदर्भात देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. परंतु त्यासोबतच हिंदू समाजातील ज्या फिर्यादी युवकांनी फिर्याद दिली होती त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्हा हा मागे घ्यावा यासाठी देऊळगाव राजा येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने देऊळगाव राजा शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते दरम्यान अकरा वाजता देऊळगाव राजा शहराचे आराध्य दैवत असलेले श्री बालाजी महाराज मंदिरासमोरून हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला,सदर मोर्चा कमिटी चौक, मार्गे बस स्थानक चौकात आला त्यानंतर समाजातील काही नेत्यांनी आपल्या भाषणातून रोष प्रकट केला आक्षेपाहार्य पोस्ट केल्याप्रकरणी प्रकरणी सदर माथेफिरू समाज कंटकास पोलीसांनी अटक करून पोलीस स्टेशनला आणले.
महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी संबंधित पोलीस स्टेशन कडूनच माथेफिरू समाज कंटकावर वर गुन्हा दाखल करणे बंधनकारक असतांना, तसे न करता आपण तक्रार दाखल करा तेंव्हाच माथेफिरू समाज कंटकावर गुन्हे दाखल होतील असे शिवभक्त युवकांना सदर पोलीस स्टेशनकडून सांगण्यात आले.सबब असंतोषाच्या भावनेतून काही शिवभक्त युवकांनी पोलिसांच्या सांगण्यावरून सदर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली यावरून महाराजांचा अवमान करणाऱ्या माथेफिरू समाज कंटकावर दि. ०३ ऑक्टोंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
परंतु याउलट पाठोपाठ तक्रार देणाऱ्या हिंदू युवकांवरही दि.०४ ऑक्टोंबर रोजी विनाकारण विनापुरावे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे समस्त देऊळगांव राजा शहरात व आजू बाजूच्या परिसरामध्ये असंतोष पसरला गेला असून, या असंतोषाचा पुढे उद्रेक होवू नये व शहरामध्ये शांतता राहावी यासाठी शिवभक्तांवर दाखल केलेले खोटे गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावे, अशी आग्रही मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली.
दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी मनीषा कदम यांनी बस स्थानक चौकात मोर्चाकरांचे निवेदन स्वीकारले.