ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अखेर हत्तीचा कळप जिल्ह्याबाहेर हाकलण्यास सावली वनविभागाला यश

वनपरीक्षेत्र अधिकारी धुर्वे यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

सावली – तालुक्यातील सामदा, वाघोली बुट्टी, सोनापूर, चकपेटगाव, व्याहाड बुज. या भागात हतीच्या कळपाने शिरकाव करीत शेतपिकांची नासधूस सुरु केल्याने शेतकरी चिंतेत सापडले होते.सावलीचे वनपरीक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांनी वनविभागाच्या टीमच्या सहकार्याने हत्तीचा कळप पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात हाकलल्याने तालुक्यातील जनता त्यांचे कौतुक करीत आहे.

पाच ते सहा दिवसापूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील वाकडी, सेमाना भागातून 27 संख्येच्या हत्तीचा कळप वैनगंगा नदी पार करीत सामदा, वाघोली भागात प्रवेश केला. त्यानंतर त्या भागातील शेतपिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतेत सापडले. वनपरीक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांनी पथक तयार करून रात्रंदिवस लक्ष ठेऊन हत्तीना चंद्रपूर जिल्ह्यातील सीमेवरून हाकलले. त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याने त्यांचे कौतुक केल्या जात आहे.

हत्तीचा कळप हाकलण्यात वनविभागाला यश आले आहे. परंतु पाच ते सहा दिवस जे धान पिकांचे नुकसान झाले आहे त्याचे तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्यात यावी.

        अनिल स्वामी, अध्यक्ष सेवा सहकारी सोसायटी सावली

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये