ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बोरधरण येथे बोर व्याघ्र प्रकल्पातर्फे फोटोग्राफर साठी वन्यजीव फोटो स्पर्धा !

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा- जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील अंतर्गत येणाऱ्या बोरधरण येथे बोर व्याघ्र प्रकल्पातर्फे असणाऱ्या वन्यजीव प्राण्यांचे फोटो काढण्याची स्पर्धा चे आयोजन केले आहे तरी वन्यजीव फोटोग्राफर यांनी वन्यप्राण्यांचे 24 बाय 18 आकाराचे फोटो दि.06/10/2024 पर्यंत उपसंचालक बोर व्याघ्र प्रकल्प वर्धा अथवा वनपरिक्षेत्र अधिकारी बोरधरण यांच्या कार्यालयात दुपारी 2 वाजेपर्यंत पोहोचतील अशा बेताने सादर करावी.

स्पर्धेसाठी असलेली प्रथम पारितोषिक बक्षीसे 10000 रुपये, दुय्यम पारितोषिक 7000 रुपये व तीसरे पारितोषिक 5000 रुपये या प्रमाणे ठेवण्यात आली आहे तरी काही संशय काही विचारणा असल्यास डेप्युटी डायरेक्टर महेश ठेंगडी वनविभाग अधिकारी श्रीमती अर्चना नौकरकर मॅडम उपसंचालक बोर व्याघ्र प्रकल्प अधिकारी यांच्या खाजगी भ्रमणध्वनी क्रमांक 70 20 13 82 74 वर संपर्क साधावा.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये