Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एन. सी. सी.च्या पाच विद्यार्थ्यांची आर्मी व पोलीस विभागात निवड

शिवम काळे, प्रतीक खंगार व साहिल बारतीने यांची आर्मी (अग्निवीर ) मध्ये तर प्रशांत बडगुरवार व योगेश ढवस यांची पोलीस विभागात झाली निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाच्या एन.सी.सी. च्या पाच विद्यार्थ्यांची नुकताच आर्मी व पोलीस विभागात निवड करण्यात आली.

     महाविद्यालयातील एन. सी. सी. चे लेफ्टनंट सचिन श्रीरामे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅडेट्स शिवम काळे, कॅडेट प्रतीक खंगार व कॅडेट साहिल बारतीने यांची आर्मी (अग्निवीर ) मध्ये तर सार्जंट प्रशांत बडगुरवार व सार्जंट योगेश ढवस यांची पोलीस विभागात निवड झाली.

यांच्या या निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. एस. लडके, उपप्राचार्य डॉ. अपर्णा धोटे व एन. सी. सी. चे प्रमुख लेफ्टनंट सचिन श्रीरामे यांनी महाविद्यालयात पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच त्यांचे महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये