आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिवस साजरा
एकुण 414.525 किलोग्रॅम गांजा नाश प्रक्रियेव्दारे निर्जन परिसरात जाळून नष्ट
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
२६ जुन हा दिवस आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिवस म्हणुन साजरा करण्याबाबत डिसेंबर 1987 मध्ये संयुक्त राष्ट्राचे आम विधी मंडळामध्ये निर्णय घेण्यात आला त्यास अनुसरुन दरवर्षी देशात 26 जुन हा आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिवस म्हणुन साजरा करण्यात येतो. अंमली पदार्थचे सेवन ही एक जागतिक समस्या आहे. राज्यात अंमली पदार्थाचे विक्रीस व त्याचे सेवनास जास्तीत जास्त आळा बसणे अत्यावश्यक आहे. शहरी भागात विशेषतः महानगरांमध्ये तरुण मुले विद्यार्थी/युवक हे ड्रग्जच्या व्यसनाच्या आहारी जात असल्याचे दिसुन येत आहे. ड्रग्ज सेवनामुळे तरुणांचे आयुष्य उध्वस्त होत आहेत. अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत सर्वसामान्य जनतेमध्ये जनजागृती करण्याचे उद्देशाने खालीलप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
दिनांक 26 जून 2023 रोजीचे सकाळी 08.00 वाजता 500 शाळकरी मुलामुलींची अंमली पदार्थ विरोधी प्रभातफेरी (रॅली) काढण्यात आली. सदर रॅलीला मा. जिल्हाधिकारी, वर्धा यांनी हिरवी झेंडी दाखवुन संबोधित केले व विद्यार्थ्यांना अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबतचे महत्व समजावुन सांगितले. अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबतचे महत्व समजावुन सांगण्यासाठी NGO च्या मार्फतीने पथनाट्य सादर करण्यात आले. शाळा/कॉलेज झोपडपट्टी परिसरात जनजागृती कार्यक्रम घेवुन युवक- युवतींना अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत व अंमली पदार्थाच्या व्यसनाच्या धोक्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ट्रक चालक, आटो चालक व दुचाकी चालक व मोहल्ल्यामध्ये नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाटी पाम्फलेटसचे वाटप करण्यात येवून गांवामध्ये व शहरात अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत प्रदर्शनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. बॅनर / होर्डींग्ज/पाम्फलेट्सव्दारे बसस्टॉप / रेल्वे स्टेशन तसेच शहरातील मोठे चौरस्ते, शाळा/कॉलेज व गर्दीच्या ठिकाणी मोठयाप्रमाणात प्रसिध्दी करून जनजागृती करण्यात आली.
आज दिनांक 27/06/2023 रोजी मा. श्री नूरुल हसन, पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे अध्यक्षतेखाली स्थापीत डॉ. श्री सागर कवडे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा तसेच श्री कांचन पांडे, पोलीस उप अधिक्षक (गृह), वर्धा यांचे ड्रग्ज डिस्पोजल कमिटी समक्ष पो.स्टे. कारंजा अपराध क्र.327/2022 मधिल (265.325 किलोग्रॅम गांजा) व पो.स्टे. रामनगर अपराध क्र. 241 / 2021 मधिल (149.200 किलोग्रॅम गांजा) असा एकुण 414.525 किलोग्रॅम गांजा नाश प्रक्रियेव्दारे शासकीय पंच साक्षीदारांसमक्ष पोलीस मुख्यालयाचे निर्जन परिसरात जाळून नष्ट करण्यात आला.
सदर नाश प्रक्रियेत श्री संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा, श्री कमलाकर घोटेकर, राखीव पोलीस निरीक्षक तसेच पो.हे.कॉ. गिरीश कोरडे / 544 व स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला.
याप्रमाणे वर्धा जिल्हा घटकांतर्गत वविध उपक्रम राबवुन तसेच कार्यक्रमांचे आयोजन करून जनजागृती करण्यात आली व 26 जून 2023 हा दिवस जागतीक अंमली पदार्थ विरोधी दिवस म्हणुन साजरा करण्यात आला.