ताज्या घडामोडी

राजुरा तालुका केमिस्ट अँड ड्रॅगिस्ट असोसिएशनने साजरा केला फार्मसिस्ट डे

रुग्णांना फळ वाटप तसेच ज्येष्ठ सदस्यांचा केला गौरव

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

राजुरा तालुका केमिस्ट अँड ड्रॅगिस्ट असोसिएशन च्या वतीने पंधरावा जागतिक फॉर्मासिस्ट दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. २००९ साली आंतरराष्ट्रीय फार्मास्यूटिकल फेडरेशन (एफ आय पी) च्या वतीने २५ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय फार्मासिस्ट दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश जगभरातील फार्मासिस्ट चे आरोग्य सेवेतील महत्वाच्या योगदानाची माहिती जनतेपर्यंत पोहचवणे हा आहे.

फार्मासिस्ट असोसिएशनचे जिल्हा संघटन सचिव प्रशांत गोठी ह्यांच्या मार्गदर्शनात राजुरा तालुका केमिस्ट अँड ड्रॅगिस्ट असोसिएशन च्या वतीने राजुरा उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर असोसिएशन चे ज्येष्ठ सदस्य नवरतन गोठी, प्रकाश चांडक, गोविंद साबनानी ह्यांचा राजुरा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक जाधव ह्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

असोसिएशन चे सदस्य शेखर आंबटकर आणि रोहिणी बोबडे ह्यांना वाढदिवसानिमित्य शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक जाधव, डॉ. अमित चिंदमवार, डॉ. इर्शाद शेख, डॉ. गोनेपल्लीवार, डॉ. गायकवाड, गायत्री हिंगाणे, धनंजय वाघ, आशिष भांदककर, असोसिएशन चे तालुका अध्यक्ष कैलास रेगुंडवार, तालुका सचिव राकेश अल्लूरवार, माजी तालुका अध्यक्ष हितेश डाखरे, माजी तालुका सचिव धनंजय बोबडे, प्रकाश चांडक, गोविंद साबणानी, सचिन पिंपळकर, भूषण पांढरे, दिनकर काळे, अभय पोशट्टीवार, संदीप जैन, कमल बजाज, जयप्रकाश सारडा, सचिन सावे, मनिष बांबोडे, प्रवीण मडावी, अमोल चोथले, प्रशांत मग्गीडवार, मनोज सदाफळे, गणेश कोंडावार, सूरज पिंपळशेंडे, शालिनी कुईटे, सोनाली लांडे, दीपाली शेंडे ह्यांची उपसस्थिती होती,

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये