ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात किशोरवयीन मुलींसाठी कार्यशाळा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे “किशोरवयीन वयात होणारे बदल व त्याची घ्यावयाची काळजी” यावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. साईनाथ मेश्राम होते, प्रमुख मार्गदर्शक डॉ. स्वप्नील टेंभे (तालुका आरोग्य अधिकारी कोरपना व जिवती), मा. योगिता आंबेकर (अर्श समन्वयक),मा. ॲड. मंगला बोरीकर (PCNDT सल्लागार) जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर, होत्या, प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. कल्पक ठमके (आरोग्य सेवक गडचांदूर, प्रा. प्रफुल्ल माहुरे (उपप्राचार्य), प्रा. नंदा भोयर प्रा.संगीता गिरी , प्रा. आरजू आगलावे होत्या.

याप्रसंगी उपस्थीत मान्यवरांनी किशोरवयीन वयात होणारे बदल, घ्यावयाची काळजी, याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले, याप्रसंगी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा. नरेंद्र हेपट यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये