जुगनाडा शाळेत प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी:- ब्रह्मपुरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जुगनाडा येथे 23 जून 2025 रोजी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे चिमुकल्यांची ट्रॅक्टर वर काढलेली मिरवणूक. अतिशय आकर्षकरित्या ट्रॅक्टरला सजवून विद्यार्थ्याची मिरवणूक काढण्यात आली. सोबतच विद्यार्थ्यांच्या नारे घोषणांनी परिसर दुमदुमला.
या कार्यक्रमाचे उद्घाटिका म्हणून उपविभागीय अधिकारी माननीय पर्वणी पाटील मॅडम, अध्यक्षा मा. सौ लक्ष्मीताई सहारे सरपंच ग्रामपंचायत जुगनाळा होत्या.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.श्री गोपाल ठाकरे उपसरपंच, मा. श्री गोपाल तोंडरे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, मा. गायत्री तोराम विस्तार अधिकारी, मा. कायरकर मॅडम ग्रामपंचायत अधिकारी जुगनाळा, शाळेचे मुख्याध्यापक गजानन प्रधान, मा. प्रगती ढोरे सदस्या, तसेच अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, प्रतिष्ठित नागरिक , पालक वर्ग व युवके यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. नवांतूक विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम, गणवेश वितरण कार्यक्रम, शूज व पायमोजे वाटप कार्यक्रम, ग्रामपंचायत तर्फे नवीन विद्यार्थ्यांना बॅग वाटप कार्यक्रम, अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना गणवेश व शूज वाटप कार्यक्रम, तसेच शाळेतर्फे नवीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमातच पर्वणी पाटील मॅडम व गायत्री तोराम यांचा ग्रामपंचायतच्या वतीने शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
उन्हाळी शिबिरात स्वयंसेवकाची भूमिका पार पडणाऱ्या दुर्गेश देव्हारी, निकेश ठाकरे ललित निकुरे या युवकांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना यशस्वी होण्याचा मूलमंत्र दिला. शाळेचा दर्जा व गुणवत्ता टिकवून ठेवावी व शाळेचा नाव लौकिक वाढवावा अशी अपेक्षा विद्यार्थ्यांकडून केली. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम देखील घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गोवर्धन टिकले सर, प्रास्ताविक योगराज बोरकुटे सर तर आभार प्रदर्शन संगीता वैद्य मॅडम यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभा गणवीर मॅडम, धनपाल दमके सर व स्वाती नाकाडे मॅडम यांचे सहकार्य लाभले. शाळा स्थापन समिती व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने उत्कृष्ट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना खाऊ व मिष्टान भोजन देऊन करण्यात आली.