ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बोथली येथे रक्तदान शिबिर आणि गुणवंतांचा सत्कार

अष्टविनायक सार्वजनिक गणेश मंडळांचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

अष्टविनायक सार्वजनिक गणेश मंडळ बोथली येथे अनेक वर्षांची परंपरा कायम ठेवत याही वर्षी मंडळाच्या वतीने रक्तदान हेच सर्व श्रेष्ठदान हे उक्ती समोर ठेऊन भव्य रक्तदान शिबिर आणि गावातील सार्वजनिक वाचनालयात अभ्यास करणाऱ्या दहावी आणि बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.

आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटक आणि मार्गदर्शक म्हणून संवर्ग विकास अधिकारी मधुकर वासनिक तर अध्यक्ष म्हणून सरपंच सुशील नरेड्डीवार उपस्थित होते.गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून पोलीस उपनिरीक्षक सचिन मुसळे आणि नायब तहसीलदार किशोर मडावी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आधुनिक युगात विद्यार्थ्या पुढील आव्हाने आणि स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक केले.प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर प्रा.शेखर प्यारमवार,मुख्याध्यापक दुमाजी आदर्लावार,विवेक बुर्लावार,कमलाकार पाडेवार,ग्रामसेवक कुरेकार उपस्थित होते.

रक्तदान शिबिरात एकूण ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले आणि २२ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन पोलिस पाटील ताराचंद खोब्रागडे आणि केले तर आभार निलेश पूटकमवार यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अष्टविनायक सार्वजनिक गणेश मंडळाच्या सदस्यांचे सहकार्य लाभले.सदर सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये