ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

37 वर्षीय विधवा महिलेवर अत्याचार

आरोपीस अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           वाढदिवस साजरा करण्याचे निमित्त करून एका 37 वर्षीय विधवा महिलेवर आरोपीने अत्याचार केल्याची घटना तालुक्यातील मानोरा जंगलात घडली. सदर घटनेची तक्रार पीडित महिलेने भद्रावती पोलिसात केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. रवींद्र सोनटक्के, वय 38 वर्ष, राहणार पारवाई, तहसील कोरपणा असे आरोपीचे नाव आहे.

आरोपी व शहरातील एका भागात राहणाऱ्या विधवा महिलेची ओळख होती. घटनेच्या दिवशी दि. 9 सप्टेंबर रोजी आरोपीने आपला वाढदिवस जंगल शिवारात साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवल्याने पीडित महिला आपल्या एका मैत्रिणीला घेऊन त्याचे सोबत जंगल शिवारात गेली. तिथे गेल्यानंतर आरोपीने सदर पिडितेला मारहाण करून तिच्यावर अत्याचार केला. तिच्या मैत्रिणीलाही मारहाण केली असुन या घटनेची तक्रार पीडित महिलेने दि. 11 सप्टेंबर ला भद्रावती पोलिसात केली आहे. सदर घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये