ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्रह्मपुरी येथील सेवानिवृत्त शिक्षक चरणदासजी डांगे यांचे निधन

सामाजिक कार्यकर्ते प्रशांत व अ‍ॅड. राजेश डांगे यांचे पितृछत्र हरपले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रह्मपुरी :_ स्थानिक टिळक नगर येथील रहिवासी, डॉ. आंबेडकर विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक चरणदासजी मंगरू डांगे (वय ८० वर्ष) यांचे आज सकाळी ८ : ०० वाजताच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने डांगे परिवारावर शोककळा पसरली असून, ब्रह्मपुरी परिसरातील एका आदरणीय शिक्षकाला व मार्गदर्शकाला समाज मुकला आहे. चरणदासजी डांगे यांनी डॉ. आंबेडकर विद्यालय, ब्रह्मपुरी येथे दीर्घकाळ शिक्षक म्हणून अविरत सेवा दिली. आपल्या अध्यापन कौशल्याने आणि सुस्वभावाने त्यांनी अनेक पिढ्या घडवल्या.

लोक कल्याणासाठी सदैव धावून येणारे ब्रह्मपुरीतील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते प्रशांत डांगे आणि अ‍ॅडव्होकेट राजेश डांगे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सून, नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे. स्व. चरणदासजी डांगे यांच्या पार्थिवावर उद्या गुरुवार, २८ मे २०२६ अंत्यसंस्कार करण्यात येणार असून सकाळी ९ : ०० ते १०:०० वाजताच्या दरम्यान त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरून टिळक नगर, ब्रह्मपुरी येथून निघून भुती नाला येथील वैकुंठ स्मशानभूमीकडे मार्गस्थ होईल व तेथे अंतिम संस्कार पार पडतील. त्यांच्या निधनाबद्दल ब्रह्मपुरीतील शैक्षणिक, सामाजिक आणि विधी क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्त करत डांगे परिवाराप्रती संवेदना प्रकट केल्या आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये