Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महामार्गावर दरोडा घालणारी अट्टल गुन्हेगारांची कुख्यात टोळी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धाच्या जाळ्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

फिर्यादी नामे मोहम्मद अजिम मोहम्मद हाशम शेख वय 42 वर्ष, रा. रेहमतनगर, अमरावती, है दिनांक 06/09/2024 रोजी जि भंडारा येथुन डेपोची रेती त्यांचे ट्रक कमांक एम एच 12 आर एन 7784 मध्ये भरून वर्धा पुलगाव मार्ग अमरावती कडे त्यांचा सहकारी ब्रायव्हरसह जात असतांना दिनांक 07/09/2024 रोजी रात्री 12.15 वाजताचे दरम्यान नागपुर औरंगाबाद राज्य महामागनि जात असतांना पुलगावचे अलीकडे कवठा रेल्ली गावाजवळ ट्रकचे लाईटचे उजेडात रोडवर जैक दिसल्याने ट्रक थांबविला असता ट्रकसमोर अनोळखी 22 ते 25 वयोगटातील काही इंसम हातात काठ्या घेवुन आले व ट्रक बंद केला त्या अनोळखी ईसमानी फिर्यादीला व सोबतचे चालकाला ढकचे खाली उतरवून रोडच्या बाजुला शेतात नेवून काठ्यांनी मारहान करून त्याचे जवळील एक विवो कंपनीचा मोबाईल किंमत 20,000 रूपये सोबतचे चालकाचे खिशातील 5,500 रूपये, जबरीने हिसकावुन घेवुन ट्रकचे डिझेल टैंकचे लॉक तोडुन ट्रकचे टंकमधिल अंदाजे 100 लिटर डिझेल किमंत 8,300 असा एकुण 34,800 रू चा मुद्देमाल जबरीने हिसकावून नेल्याचे फिर्यादीचे तकारीवरून पोलीस स्टेशन पुलगाव येथे अपराध क्रमांक 736/2024 कलम 310 (2), 311 भारतीय न्याय सहिता सन 2023 अन्वये गंभीर स्वरूपाचा दरोडयाचा गुन्हा दाखल करण्यात जाला सदर घडलेल्या दरोडयाच्या गंभीर स्वरूपाच्या गुन्हयाचे गार्मीयं ओळखुन मा. पोलीस अधिक्षक वर्धा श्री अनुराग जैन साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखा क्धों यांना तपासकामी मार्गदर्शन करून सदर गुन्हा उघडकिस आणण्याबाबत निर्देश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विनोद चौधरी यांनी गुन्हे शाखेतील तपास पथकांसोबत घटनास्थळी जावुन घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असता सदर घटनास्थळावर आरोपीतांनी डिझेल भरलेल्या व रिकाम्या प्लास्टीकच्या कॅन सोडलेल्या असल्याने सदर कॅनवे उत्पादनाबाबत माहिती घेतली असता त्याचे उत्पादन जिल्हा उस्मानाबाद येथील असल्याचे दिसुन आल्याने त्या परीसरात अस्था प्रकारचे गुन्हे करणारे सराईत गुन्हेगार यांची माहिती घेण्यात आली घटनास्थळावर फिंगर प्रिन्ट एक्सपर्ट, डॉग स्कॉड, पथक, फुटप्रीन्ट हँडलर याना बोलविण्यात आले तसेच रोडलगत असलेल्या पेट्रोलपंप, धाबे येथील सिसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासण्यात आले. अश्या प्रकारचे गुन्हे करणारे गुन्हेगारांचे फोटो अल्बम फिर्यादी व त्याचा सह चालक याला दाखविले

सदर गुन्हयाचा तपास करीत असताना जि. अमरावती पो. स्टे. तळेगाव (दशासर) ह‌द्दीत सुध्दा दिनांक 05/09/20124 व दिनांक 06/09/2024 चे रात्री अश्याच प्रकारचे दरोडयाचे गुन्हे घडल्याची माहिती मिळाल्याने तेथेसुध्दा घटनास्थळी जावुन पाहणी केली व फिर्यादी ओम गणेश राउत्, वय 28 वर्ष, रा. पाराभवानी ता. बारशी टाकळी जि. अकोला याला विचारपुस केली असता दिनांक 05/09/2024 चे रात्री तो पिकअप गाडीने मालक आशिष आहे याचेसह नागपुर उमरेड येथे माल घेवुन जाण्यास कारंजा लाड मार्गे अंदाजे रात्री 11.30 वाजताचे दरम्यान देवगाव ते पुलगाव रोडनी जात असतांना रोडवर एक मोटरसायकल रोडलगत पडुन व 02 माणसे पडलेली दिसली, त्याला रोडवर अपघात झाला आहे असे वाटल्याने त्याने त्याची पीकअप गाडी थांबवून रोडवर पडलेल्या ईसमाजवळ गेला असता पाठीमागुन आरोपीतानी त्याना काठीने मारहान करून त्याचे मोबाईल फोन व नगदी पैसे जबरीने हिसकावून पळुन गेले.

वरील प्रमाणे घडलेल्या तिन्ही गुन्हयाचे बारकाईने अवलोकन करून तपास केला असता अश्या प्रकारचे गुन्हे करणारी टोळी उस्मानाबाद जिल्हयातील सक्रीय असल्याचे आढळून आले. तसेथ घटनास्थळावरील प्लास्टीक कन देखील जिल्हा उस्मानाबाद येथील असल्याचे दिसुन आल्याने अश्या प्रकारे गुन्हे करणा-या गुन्हेगारांची माहिती गोपणीय रित्या संकलित केली त्याचा तांत्रीक तपास केला असता तांत्रीक तपासामध्ये जिल्हा उस्मानाबाद येथील गुन्हेगाराचे घटनेवेळी सदर परीसरात वास्तव्य असल्याचे दिसून आले. त्यांचा शोध सुरू केला असता नमुद इंसम हे गोंदिया परीसरात असल्याचे तांत्रीक तपासात दिसुन आले.

तात्काळ वेगवेगळी 03 पथके तयार करून आरोपी शोध करीता रवाना केले त्यांनी हायवे रोडवरील टोलनाके चेक करून आरोपीतांचा माग काढत असतांना नमुद आरोपी ईसम हे नॅशनल हायवे ने महाराष्ट्र बॉर्डर पार करून छत्तीसगड राज्यात पोहचल्याचे निष्पन्न झाले सलग पाठलाग करून तपास पथकांनी राजनादगाव जवळ संशईत असलेल्या ईसमांची 02 ट्रक वाहने निष्पन्न करून त्याचे हालचालीवर बारकाईने पाळत ठेवून असताना दोन्ही वाहनामध्ये 08 ते 09 ईसम असल्याचे लक्षात आले पथकांनी दोन्ही वाहनांवरती ट्रैप लावून वाहनांतील ईसमांना घेराव टाकुन पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पोलीस असल्याचा संशय आल्याने त्यांनी वाहने जागीच उभी करून वाहनातुन उड्या मारून शेतात व जंगलाचे बाजुने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता जागीच 04 इसमांना पकडण्यात आले व 05 ईसमांचा शेतात 02 किमी पाठलाग करून शिताफीने जिवाची पर्वा न करता रात्रीचे अंधारात पाठलाग करून पकडले त्यापैकी दोन ईसमांनी नदी नाल्यात रात्रीचे वेळी उडी मारून पलुन जाण्याचा प्रयत्न केला त्यांना देखील जिवाची बाजी लावुन शिताफिने पकडले. सर्व आरोपीताना सुरक्षित ताब्यात घेवुन परीचय देवून गुन्हयासंबंधाने विचारपुस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना विश्वासात घेवून विचारपुस करता त्यांनी पुलगाव रोडवर ट्रकचालकास लुटले व देवगाव रोडवर सिलेंडर भरलेल्या ट्रक चालक व पिकअप चालक यांना लुटल्याची माहिती दिली. त्यावरून

आरोपी 1) भैय्या आबा काले, वय 24 वर्ष, रा. खामकर वाडी, ता वाशी, जि उस्मानाबाद 2) बबलु मोहन शिंदे, वय 24 वर्ष, रा. ईटकर ता. कळंब, जि. उस्मानाबाद

3) मधुकर आबा काळे, वय 25 वर्ष, रा. खामकर वाडी, ता. बाशी, जि. उस्मानाबाद,

4) सचिन बबरू काळे वय 23 वर्ष, रा. इंदापुर ता. वाशी, जि. उस्मानाबाद,

5) किरण महादेव काळे, वय 19 वर्ष रा. अंदोरा ता. कळंब, जि. उस्मानाबाद गोविंद तात्या पवार, वरा 18 वर्ष, रा. तेरखेडा, ता. वाशी, जि. उस्मानाबाद,

६) 7) अनिल शिवाजी काले, वय 24 वर्ष, रा. दसमे, ता. वाशी, जि. उस्मानाबाद, आणि दोन विधी संघर्षीत बालकासह 09 ईसमांना ताब्यात घेण्यात आले

वरील सर्व आरोपीताना ताब्यात घेतल्यानंतर त्यांचे ताब्यातून 10 मोबाईल फोन, नगदी पैसे व गुन्हा करतांना गुन्हयात वापरलेली वाहने ट्रक कमांक एम. एच 23 ए. गु 9299 व ट्रक कमांक एम. एच 23 ए यु 9799 असा एकूण 91.11.270/- रूपयाचा मु‌द्देमाल जप्त करण्यात आला

वरील सर्व आरोपी हे उस्मानाबाद जिल्हयातील खामकरवाडी येथील अटटल गुन्हेगार असून त्याचा पूर्व इतिहास पाहता आरोपी हे दरोडा, चोरी, जबरी चोरी करण्याचे सवईचे असल्याचे दिसुन आले आहे त्यांचेकडुन आणखी गुन्हे उघड़किस येण्याची शक्यता आहे

सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन, मा अपर पोलीस अधीक्षक श्री. सागर कवडे, मा उपविभागिय पोलीस अधिकारी श्री राहुल चव्हान, यांच्या मार्गदर्शनात मा पोलीस निरीक्षक श्री विनोद चौधरी पोलीस उपनिरीक्षक, श्री अमोल लगड, श्री. सलाम कुरेशी, पो हवा नरेद्र पाराशर, हमीद शेख, गजानन लामसे शेखर डोंगरे, सचिन इंगोले, प्रमोद पिसे, रितेश शर्मा, रामकिसन ईप्पर, संघसेन कांबळे, गोपाल बावणकर, विकास मुंडे, अरविंद इंगोले, मिथुन जिचकार, मंगेश आदे, दिपक साठे, चालक पोउपनि शिवकुमार परदेशी, स.पो.नी. राजेश पाटील सर्व स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा तसेच पोलीस अंमलदार दिनेश बोधकर, अक्षय राउत, अकिंत जिभे, सायबर सेल वर्धा यांनी केली गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये