ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आपली इच्छाशक्ती वाढविणे हे व्यक्तिमत्त्व विकासाचे मुख्य सूत्र – बंडोपंत बोढेकर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. चिमूर

आपल्या मनाच्या उच्चतर क्षमता अर्जित करण्याचा प्रयत्न केल्याशिवाय व्यक्तीमत्व विकास होणे कठीण आहे. याकरिता नवयुवकांनी आपली इच्छाशक्ती सोबतच विवेचन शक्ती वाढविली पाहिजे, असे प्रतिपादन बंडोपंत बोढेकर यांनी केले.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिमूर द्वारा आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर नुकतेच शहीद बालाजी रायपूरकर सभागृहात संपन्न झाले, याप्रसंगी ते ‘व्यक्तिमत्व विकास आणि मुलाखतीचे तंत्र’ या विषयावर बोलत होते. शिबिराच्या अध्यक्षस्थानी औ. प्र. संस्थेचे आय.एम.सी .चेअरमन अनिल मेहेर होते. उद्घाटन आ. बंटीभाऊ भांगडीया यांचे प्रतिनिधी तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजू पाटील झाडे यांच्या हस्ते झाले. शिबिराचे प्रास्ताविक प्राचार्य मुरलीधर गायकवाड यांनी केले. दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाच्या संधी या विषयावर प्रा. डॉ. खंगार यांनी मार्गदर्शन केले तर व्यक्तिमत्व विकास या विषयावर बंडोपंत बोढेकर यांनी मार्गदर्शन केले. वैद्यकीय क्षेत्रातील संधी या विषयावर डॉ. अश्विन अगडे यांनी तर पोलिस विभागातील संधी या विषयावर पोलिस निरीक्षक मनोज गभणे यांनी मार्गदर्शन केले. वनविभागातील नोकरीच्या संधी आणि प्रशिक्षण या संदर्भात वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर यांनी मार्गदर्शन केले तर राष्ट्रनिर्मितीत युवकांचे योगदान याबाबत प्रा. अशोक चरडे यांनी संवाद साधला.
या सत्रात उत्तम रांगोळीचे रेखाटन केल्याबद्दल चार विद्यार्थीनींना ग्रंथ भेट देऊन बंडोपंत बोढेकर यांनी सन्मानित केले. सूत्रसंचालन प्रकाश मेश्राम यांनी केले तर आभार प्रदर्शन गटनिदेशक राजेश कहुरके यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये