Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध दारू विक्रेत्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मांगली येथील महिला धडकल्या पोलीस ठाण्यात

अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन करू : ठाणेदाराला निवेदन सादर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

          तालुक्यातील मांगली गावात अवैध दारू विक्री जोरात सुरू असून गावातील शाळेच्या परिसरात अवैध दारूची विक्री खुलेआम सुरू असते. या दारू विक्रेत्यांना याबाबत गावकऱ्यांतर्फे समज दिल्यास ते गावकऱ्यांना धमक्या देतात. त्यामुळे गावातील वातावरण बिघडत चालले आहे. याबाबत मांगली येथील महिलांनी दिनांक ६ ला भद्रावती पोलीस ठाण्यात धडक देऊन गावातील अवैध दारू विक्रीवर कारवाई करून त्यांचा बंदोबस्त करावा यासाठी ठाणेदार बिपीन इंगळे यांना सादर केले आहे.

गावात विकल्या जाणाऱ्या अवैध दारूमुळे तरुण मुले व्यसनाधीन होत असून दारू विक्रेत्यांचा व दारुड्यांचा त्रास गावातील महिला तथा सभ्य नागरिकांना होऊन गावातील वातावरण दूषित होत आहे. त्यामुळे यावर वेळीच आवर घालून अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करावी, अन्यथा गावातील महिलांतर्फे या विरोधात तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही सदर निवेदनातून देण्यात आला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये