Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

अत्याचारग्रस्त युवतीच्या आत्महत्येने समाजमन सुन्न – लॉज व्यवस्थापकावर पोस्कोचा गुन्हा दाखल

पीडितेच्या आत्महत्येने शंका कुशंकांना पेव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी

मुन्ना खेडकर बल्लारपूर

बल्लारपूर :- 3 सप्टेंबर रोजी बल्लारपूर पोलीस स्टेशन मध्ये दोन अत्याचार झाल्याची घटना दाखल झाली.एका घटनेत सोळा वर्षीय मुलगी वर शिवम दिनेश दुपारे (21) रा. मौलाना आझाद वॉर्ड याने 2 सप्टेंबर चा रात्री OYO हॉटेल शांती लॉज काटा गेट येथे नेऊन अत्याचार केल्याची रिपोर्ट दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी शिवम याला अटक करून ताब्यात घेतले असता दुसऱ्या दिवशी 4 सप्टेंबर रोजी 12 वाजताच्या दरम्यान 16 वर्षीय पिडीतेने आपल्या राहते घरी परिवारातील जवळपास सर्व सदस्य घरी असतांना गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटना स्थळी दाखल होऊन पंचनामा करून पार्थिव ताब्यात घेऊन शवविच्छेदना करिता चंद्रपूर येथे रेफर केले.

पीडितेच्या घरी परिवारातील सर्व सदस्य उपस्थित असताना पिदितेने फाशी घेऊन आत्महत्या केलीच कशी? मुलीवर कुणामुळे मानसिक दबाव आला असेल? अशा शंका कुशंका उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान अशीही चर्चा आहे की दोघांचे प्रेम संबंध होते आणि दोघेही लग्न करणार होते. मुला वर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाल्याने मुलगी मानसिक दबावात असेल म्हणून आत्महत्या केली असावी? असे विविध प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.

घटनेतील ताज्या घडामोडीनुसार बल्लारपूर पोलिसांनी पीडित युवती अल्पवयीन असल्याने तिच्यावर अत्याचार करण्यासाठी उपयोगात आणलेल्या OYO लॉज (शांती लॉज) चे व्यवस्थापक राकेश दिनानाथ पांडे व बंडु बळीराम कमटकर ह्याचेवार बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यानुसार (पोस्को) नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

दुसऱ्या घटनेत मतिमंद मुलगी (35) घरात एकटीच असताना शेजारील चंदू बालू बुक्या (58) याने मुलीवर अत्याचार केलाचे लक्षात आल्याने पीडितेच्या आईने बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुलगी घरात एकटीच होती आई दिवसा हॉटेल वर कामाला गेली होती, सायंकाळी घरी आल्यावर घरी मतिमंद मुलगी खाटेवरून खाली पडलेली दिसली. घरी कोणीच नसताना घरी कोण आले असे घरमालकाला विचारले असता त्याने घरी चंदू (58) आल्याचे सांगितले. आई ने मुलीची शहानिशा करून पोलीस स्टेशन गाठले आणि अत्याचाराची तक्रार चंदू विरोधी दाखल केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये