Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्वयंशासनाचा उपक्रम प्रशंसनीय – प्राचार्य डॉ. सोनारे

महाविद्यालयाचे विद्यार्थी बनले शिक्षक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

देवळी : ‘शिक्षण क्षेत्रामध्ये आपले करिअर घडवावे याकरिता शिक्षक दिनाच्या निमित्य कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘एक दिवसीय शिक्षक’ भूमिका निभवून स्वयंशासनाचा उपक्रम यशस्वी केला. या उपक्रमातून संवाद कौशल्य, अध्यापन कौशल्य व वक्तृत्व कला विकसित होते. स्वयंशासनाचा उपक्रम प्रशंसनीय आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सुनिता सोनारे यांनी 5 सप्टेंबर रोजी आयोजित स्थानिक एस एस एन जे कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना केले.

कला शाखेचे ज्येष्ठ प्राध्यापक कॅप्टन मोहन गुजरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वयंशासन हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी प्रा. डॉ. नीलिमा बरगट व प्रा. पूनम राऊत उपस्थित स्थित होत्या.

याप्रसंगी एनसीसी छात्र सैनिक कोमल शितळे हिने ‘प्राचार्य’ म्हणून तर शितल नगराळे हिने ‘पर्यवेक्षक’ म्हणून काम सांभाळले. प्राध्यापकांच्या भूमिकेत पायल चौके, शितल अष्टकार, अस्मिता दडांजे, देवीका मंगरे, अपेक्षा नेवारे, प्रतीक्षा पाटमासे, निखिल मेश्राम, नयन तुमसरे, पूर्वा कापटे, साक्षी पारिसे, सलोनी अजमीरे, श्रुती कोल्हे विद्या खोबरे व निशा कांबळे यांनी इंग्रजी इतिहास समाजशास्त्र व वस्त्र शास्त्र या विषयाचे अध्यापन करून आपली भूमिका निभविली.

यशस्वीतेकरिता एनसीसी अंडर ऑफिसर श्रद्धा मडावी, मनीषा मडकाम, तेजस धोटे व छात्र सैनिकांनी प्रयत्न केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये