बायपासवरील दुभाजकांची उंची 15 दिवसांत कमी करा – प्रमोद घोगेपाटील
अन्यथा रास्ता रोको आंदोलनचा इशारा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
शहराच्या बाहेरून जाणाऱ्या बायपास रस्त्यावरील दुभाजकांची उंची प्रमाणापेक्षा जास्त असल्यामुळे रस्ता क्रॉसिंगच्या ठिकाणी दुचाकी स्वारांना किंवा कार चालकांना आडवे येणारे वाहन दिसत नाही. आणि यामुळे बायपासवरील सावखेड भोई चौफुली, सातेफळ चोफुली, शिवाजीनगर चौफुली, तसेच खोरेश्वर महादेव मंदीर चौफुली, या चारही ठिकाणी नेहमीच अपघात होतात.
या ठिकाणी अपघातामुळे आतापर्यंत कितीतरी जनांना अपंगत्व आले असुन काही जणांना प्राण गमवावे लागले आहेत. मागील आठ दिवसांमध्ये या ठिकाणी तिन अपघात झाले असुन यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. तरी संबंधित विभागाने पुढील पंधरा दिवसांत या चौफुलीवरील दुभाजकाच्या दोन्ही बाजूने प्रत्येकी शंभर फुटापर्यंत उंची कमी करावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने याठिकाणी लाक्षणिक रास्तारोको आंदोलन करन्यात येईल अशा इशारा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रमोद घोंगेपाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनामध्ये दिला आहे.