डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य सामाजिक न्यायासाठी व समानतेसाठी प्रेरणास्थान – रवींद्र मुप्पावार
विश्वशांती विद्यालयात डॉ.आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक कार्य हे सामाजिक न्यायासाठी आणि समाजासाठी एक प्रेरणास्थान आहे.त्यांनी आपल्या कार्याद्वारे समाजात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले आणि आजही ते लाखो लोकांना प्रेरणा देत आहेत. अस्पृश्यावरील अन्याय,जातीभेद आणि सामाजिक विषमतेविरुद्ध लढण्यासाठी समर्पित होते,त्यांनी शिक्षण आणि ज्ञानावर भर दिला आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून काम केले असे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार बोलत होते.
भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीद्वारा संचालित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा प्रथम क्रमांक प्राप्त विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक उच्च माध्यमिक शिक्षक धनंजय गुरनुले यांनी शिक्षण हे समाज परिवर्तनाचे हत्यार आहे त्याचा योग्य उपयोग झाला पाहिजे असे म्हणत डॉक्टर आंबेडकर यांच्या शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकला.
जयंती कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक संजय ढवस,सहाय्यक शिक्षक किशोर संगीडवार,धर्मेंद्र दुधे,कॉन्व्हेंटचे प्राचार्य पांडुरंग अमृतवार, श्वेता खर्चे उपस्थित होते.
याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी भीमगीते व भाषणे सादर करीत उत्स्फूर्त सहभाग दर्शविला.कार्यक्रमाच्या संचालन सहाय्यक शिक्षिका वनिता गेडाम आणि आभार सहाय्यक शिक्षक महेश देहारकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.