ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गिरोली येथे शेतातील तारेचे कुंपण उपटल्यावरून मारहाण

४आरोपी विरोधात गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

तालुक्यांतील गिरोली खुर्द शिवारात शेतातील तारेचे कुंपण उपटल्या वरून मारामारी झाल्याची घटना ३० जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजता घडली,फिर्यादी संध्या त्र्यंबक झिने यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी ४आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वृत्त असे की,आरोपी एकनाथ मस्के यांने फिर्यादीच्या शेताला बांबू बांधुन ताराचे केलेले कुंपन उपटले यावरुन फिर्यादी व साक्षीदार हे आरोपी यांना म्हणावयास गेले असता आरोपीनी फिर्यादीच्या पतीस लोटपाट केली तसेच फिर्यादी हिचा मुलगा याला पकडुन बांबुच्या काठीने पाठीवर उजव्या हाताच्या बोटावर व मांडीवर मारून जखमी केले तसेच जातीवाचक शिवीगाळ केली व तुम्ही आम्हांला येथुन जाण्यास अडविले तर तुम्हांला जिवाने मारुन टाकु अशी धमकी दिली आहे. अश्या आशयाची तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपी एकनाथ मस्के, तुळसाबाई मस्के, मनोहर मस्के, गहीनाथ मस्के यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे , पोलिस निरीक्षक संतोष महल्ये यांनी रात्री च घटनस्थळी भेट दिली,पुढील तपास उपविभाग पोलिस अधिकारी करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये