ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपना नगरीत संत गाडगेबाबा 148 वी जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

श्री संत गाडगेबाबा धोबी समाज मंडळ कोरपण्याच्या वतीने निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 148 व्या जयंती महोत्सवाचे आयोजन श्री संत गाडगेबाबा नगर कोरपणा येते पार पडला

गाडगेबाबा तुकडोजी महाराज व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मालार्पन करण्यात आले तसेच प्रमुख पाहुण्याचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन मान्यवराचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वनाथ मुक्के जिल्हाध्यक्ष, सुभाष शिंदे संस्थापक अध्यक्ष, डेबू सावली देवडा, तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विजयरावजी बावणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर,बंडू रोहनकर सचिव, अशोक तुराणकर उपाध्यक्ष, उद्धव नांदे,राजकुमार चिंचोलकर,अध्यक्ष धोबी समाज राजुरा ऋषिकेश व अतुल भरत रेळे यांचे गाडगेबाबा यांच्या जीवनावर अतिशय सुंदर असे प्रबोधन केले

तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले विजयरावजी बावणे यांनी धोबी वरती समाजासाठी मदत करण्याची आश्वासन दिले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वनाथ जी मुक्के जिल्हा अध्यक्ष यांनी सुद्धा समाजातील सर्व धोबी समाजाला मदत करण्याचे आश्वासन दिले या कार्यक्रमाकरिता कोरपना तालुक्यातील सर्व धोबी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये