Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विलास मोहिते यांचे मरणोत्तर नेत्रदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 देऊळगाव राजा शहरातील व्यावसायिक विलास मोहिते यांचे दिनांक 28 ऑगस्ट रोजी ब्रेन ह्याम्रेज मुळे दुःखद निधन झाले मृत्यु पश्र्चात त्यांची मुले राहूल व पवन यांनी त्यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला व जायंटस परिवाराचे डॉक्टर अशोक काबरा व सन्मती जैन व सामाजिक कार्यकर्ते दिलीप शेजुळकर यांना याची माहिती दिली वरून जालना येथील गणपती नेत्रालयाचे चमुने येऊन विलास मोहिते यांचे मरणोत्तर नेत्रदान करून घेतले मृत्यू समयी त्यांचे वय 54 वर्षाचे होते.

शहरातील नाभिक समाजाच्या सर्व समाज बांधवांनी यापूर्वीच मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केलेला असल्यामुळे ज्या ज्या वेळी या समाजातील व्यक्तीचे निधन होते त्यांच्या कुटुंबातील सर्वच सदस्य मरणोत्तर नेत्रदान करण्यासाठीं पुढाकार घेतात हे फार महत्वाचे असुन यांचा आदर्श इतर समाजाने घेतल्यास ही चळवळ अधिक गतिमान होउन भारतातील अंधांचे प्रमाण कमी होण्यास निश्चितच मदत होईल यात तिळमात्र शंका नाही.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये