Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी वर्धेत शिदोरी आंदोलन !

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा- जिल्ह्यात आज महाविकास आघाडी तर्फे व शिवसेना पार्टी उध्दव बाळासाहेब ठाकरे गट व विविध संघटना तर्फे आयोजित शेतकरी किसान शिदोरी आंदोलन मध्ये शिवसेना ऊं.बा.ठा चे शिवसैनिकांनी भाग घेतला आणि यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे राकेश मंशानी, व पार्टीचे कार्यकर्ते यांनी वर्धा जिल्हाचे जिल्हाधिकारी श्री राहूल कर्डिले यांना निवेदन देण्यात आले आहे व शेतकरी यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात यावे असे आवाहन शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे मागणी करण्यात आली आहे.

यावेळी शिदोरी आंदोलन मध्ये राकेश मशांनी प्रविण अमनेकर, पद्माकर कांबळे, भानुदास पाटील, संतोष पंजावानी, नाजीर खान, इकबाल कुरेशी, अनिल कांबळे, मधु मुन, अजय ताकसांडे, देवानंद कांबळे यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस, डॉ अभ्युदय मेघे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), अनेक विविध संघटना शेतकरी किसान शिदोरी आंदोलनात सहभागी झाले होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये