ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

(तालुका स्तरीय विज्ञान नाट्य महोत्सव-२०२३-२४) च्या स्पर्धेत

ने.हि.Boys स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावीत जिल्हा पातळीवर मारली मजल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

ब्रम्हपुरी :-पंचायत समिती ब्रह्मपुरी शिक्षण विभागातर्फे आयोजित तालुकास्तरीय नाट्य महोत्सव सन 2023-24 च्या नेवजाबाई हितकारणी boys विद्यालय येथिल विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नाटिका सादर करून जवळजवळ पंधरा शाळांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.

वरील महोत्सवाचे आयोजन नेवजाबाई हितकारणी कन्या विद्यालय ब्रह्मपुरी येथे करण्यात आले होते. वरील नाट्य महोत्सवामध्ये तालुक्यातील एकूण पंधरा शाळांनी भाग घेतला होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही तालुक्यातून जिल्हास्तरावर निवड होणारी ने.ही.विद्यालय मुलांची शाळा यांनी परंपरा जोपासून प्रथम क्रमांक पटकावला.

अंधश्रद्धा निर्मूलन या ज्वलंत विषयावरती उत्कृष्ट नाटिका सादर करून समाजामध्ये बोधप्रत असा संदेश देण्यात आला व प्रेक्षकांची मने जिंकण्यात आली. वरील नाटिका सादर करणारी हायस्कूलचे विद्यार्थी व संपूर्ण शाळेतील शिक्षक व शिक्षिका वृंद यांना श्रेय देण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये