Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्रह्माकुमारी द्वारा कोरपणा पोलीस स्टेशन मध्ये रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय केंद्र चंद्रपूर येथील शाखा कोरपणा येथील ब्रह्मा कुमारीज शाळेच्या वतीने रक्षाबंधन चा कार्यक्रम पोलीस स्टेशन कोरपणा येते 24 ऑगस्ट ला साजरा करण्यात आला

भारतीय संस्कृती किंवा सनांतन धर्माची परंपरा ब्रह्मा कुमारीज सातत्याने दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण सुद्धा मनुष्यांच्या जीवनातील पाच विकार किंवा पाच दुर्गुण यावर विजय मिळवण्यासाठी किंवा दुर्गुणापासून रक्षण करण्यासाठी परमात्मा शिव या पृथ्वीवर आले आहे आत्म संस्कृतीचे बंधन बांधत आहे याचीच यादगार म्हणून रक्षाबंधन पोलीस भावांना बांधत आहे यावेळी पोलीस निरीक्षक देवानंद केकन सर उपस्थित होते.

चंद्रपूर सेवा केंद्राच्या ब्रह्ना कुमारी अर्चना दीदी व सरिता दीदी यांनी सर्व पोलीस बांधवांना राख्या बांधल्या यावेळी कोरपणा पोलीस बांधवांनी आम्ही सर्व बहिणीचे रक्षण करू असे दीदींना वचन दिले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये