ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अंधश्रध्दा निर्मूलन उपक्रमातून जनजागृतीv

ग्रामपंचायत पाचगाव व श्री शिवाजी महाविद्यालय राजुराचा संयुक्त उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- विश्वास, भक्ती, श्रध्दा हे मानवी जिवनाचे अविभाज्य अंग बनले आहे.ते स्विकारताना मनाला प्रश्न ही पडला पाहिजे की हे वास्तव आहे की भुलभुलय्या.आज भोळ्याभाबड्या, अशिक्षित किंबहुना सुशिक्षित लोकांच्या अंतर्मनाचा वेध घेत चमत्कार व भिती दाखवून लुबाडण्याचा प्रयत्न होताना दिसतो.जादु-टोना,भुत-पिशाच्च, चमत्कार ह्या भ्रामक कल्पनाचं नसून शुद्ध बदमाशी आहे.अशा प्रवृत्ती पासून सावध व्हा असे सांगताना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा सचिव धनंजय तावाडे यांनी उपस्थित जनसमुदाया समोर काही प्रयोग करून सत्य स्थिती अवगत करून दिली.

       ग्रामपंचायत पाचगाव व श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा यांचे Superstition & Scientific Attitude या उपक्रमांतून अंधश्रद्धा निर्मूलनावर एक दिवसीय वर्क शाप आयोजित करण्यात आले. क्रांतीवीर शहिद बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीदिनी आयोजित कार्यक्रमाची सुरुवात अभिवादन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

       अध्यक्षस्थानी ग्रा.प.सदस्य बापुराव मडावी होते.मुख्य अतिथी व मार्गदर्शक धनंजय तावाडे, शिवाजी महाविद्यालयाचे प्रा.विश्वास शंभरकर,प्रा.डाॅ.विठ्ठल आत्राम,प्रा.वसाके,प्रा.सागर ओडेलीवार, दिवाकर मडावी होते. प्रमुख उपस्थिती पो.पा.शंकर खामनकर,तमुस अध्यक्ष प्रकाश कोहपरे,माजी सरपंच शंकर गोनेलवार, सदस्य मनोज कुरवटकर,पिसा पेंदोर, भास्कर पा.लाड,माजी पं.स.सदस्या सुनंदा डोंगे, सदस्या शुभांगी गोनेलवार,पार्वता तलांडे, ग्रामविकास अधिकारी सुनील कुमरे, शामराव कोटनाके,जंगा सिडाम यांची होती.

        प्रा.विश्वास शंभरकर यांनी अंधश्रद्धेपासून दूर राहून आपल्या पाल्यांना शिक्षणात सहभागी करा असे सांगत शिक्षणाचे महत्त्व ग्रामस्थांना सांगितले.संचालन प्रा.विठ्ठल आत्राम यांनी प्रास्ताविक प्रा.वसाके यांनी तर आभार प्रा.सागर ओडेलीवार यांनी मानले.

       यशस्वीतेसाठी विजय मेश्राम,सोनू सिडाम,रामा आळे,भाऊजी मंडाळी, मारोती शेडमाके,प्रविण आळे, सुभाष मेश्राम,संजू कोटनाके,प्रदिप शेडमाके, सुदर्शन सिडाम यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये