Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हिंगणघाट पोलीसांनी अवैधरित्या दारूविक्री करणा-या आरोपांना घेतले ताब्यात

आरोपींकडून दहा लाखाचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रगटीकरन पथकाचे अंमलदार हे पोस्टे परिसरात पेट्रोलिंग करीत असताना मुखबिर कडुन खात्रीशीर खबर मिळाली की, नंदूरी चौक हिंगणघाट येथे दोन इसम एका duet मोपेड वाहनावर देशी दारूची अवैदयरित्या वाहतूक करून माता मंदिर वार्ड हिंगणघाट येथे घेवून येत आहे,अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहीती हिंगणघाट येथील ठाणेदार मनोज गभने यांना माहिती देवून त्यांचे आदेशाने नंदूरी चौक हिंगणघाट येथे पोस्टाँप सह रवाना होवून तेथे नाकाबंदी केली. असता मिळालेल्या माहीती प्रमाणे हिरो कंपनीची duet सिल्वर ग्रे रंगाची मोपेड वाहन येतांना दिसल्याने त्यास पोस्टाफचे मदतीने नाकाबंदी करून वाहन थांबवले असता सदर वाहन चालकास त्याचे नाव गाव विचारले.

त्याने त्याचे नाव गाव प्रविण गायकवाड वय 32 वर्ष रा. कुंड शेगाव ता.हिगणघाट तसेच मोपेड वाहनाचे मागे बसून असलेल्या इसमास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव सुदन भगत रा.सुलतानपूर असे सांगितले.पंचासमक्ष मोक्यावर मोपेड वाहनांची पाहणी केली असता मोपेड गाडीचे पायदानवर ठेवून असलेल्या चुगडी मध्ये देशी दारूने भरून असलेल्या प्रीमियम न.1 कंपनीचा 90 ml चा 300 सीलबंद शिश्या प्रती 100 रु. प्रमाणे 30,000 रु. जुनी वापरती हिरो कंपनीची duet सिल्वर ग्रे रंगाची मोपेड वाहन विना नंबरची किंमत 70,000 रु. असा एकून 1,00,000 रू चा माल विनापास परवाना वाहतूक करतांना मिळुन आल्याने पंचासमक्ष मौक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून सदर माल जप्त करून आरोपी विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला.

ही संपूर्ण कार्यवाही वर्धा पोलीस अधीक्षक अनुराग जैन .अप्पर पोलीस अधीक्षक डाँ. सागर कुमार कवडे . उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत पोलिस निरीक्षक मनोज गभने, हिंगणघाट यांचे आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील सपोनी अनिल आलंदे यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात डि.बी. पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना. राहुल साठे, पोशी आशिष नेवारे,पो.शि. विजय काळे, पो.शी. अमोल तिजारे ,पो.शी संदीप बदकी यांनी केली. सदर गुन्हयांच पुढील तपास हिंगणघाट पोलीस करत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये