Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लालगुडा जि.प.शाळेत लीडर माता – गटाचा कौतुक सोहळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना : तालुक्यातील गडचांदूर केंद्रांतर्गत असलेल्या लालगुडा जिल्हा परिषद शाळेच्या वतीने शाळा पूर्व तयारी अभियानात कार्यरत माता गटातील महिलांचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक करण्यात आले. व या वर्षीची निपुण लक्ष गाठण्यासाठी ची सुरुवात स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून निपुण शपथ घेऊन करण्यात आली.

      राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN) ला अनन्य साधारण महत्व दिले असून त्यासाठी निपुण भारत मिशन कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामध्ये माता गट अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करत असल्यामुळे त्यांचा कौतुक सोहळा शाळेमध्ये घेण्यात आला. यावेळी अमावस्या तोडासे वनिता मरस्कोल्हे,मनीषा मेश्राम, वंदना तोडासे, सीता तोडासे व वैशाली तोडासे यांचा सत्कार करण्यात आला.

    या सोहळ्याला ग्रामपंचायत सदस्य श्री.मंगेश धूर्वे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. फकरू मरस्कोल्हे, श्री. भिकाजी सिडाम,श्री मोतीलाल तोडासे, मुख्याध्यापक प्रकाश बोबडे व शिक्षक गोविंद पेदेवाड उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये