ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या ०२ ट्रॅक टिप्पर, ०२ ट्रॅक्टर चालकांच्या ताब्यात

एकूण कि. ३५ लाख ३९ हजाराचा माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक ०६/०५/२०२५ रोजी स्था. गुन्हे शाखा वर्षाचे पथक पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहीती मिळाली की, मौजा दारोडा, शेकापुर बाई, डोरला या रेती घाटामधुन रेतीची अवैधरित्या वाहतुक होत आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे शहानिशा करण्याकरीता पेट्रोलींग करीत असतांना मौजा छोटी वणी, हिंगणघाट येथे नागपूर हैद्राबाद हाईवे रोडवर नाकेबंदी करून रेती वाहतुक करणारे ०२ ट्रॅक टिप्पर चालक १) लुकमान शेख गफ्फार शेख, वय ३५ वर्ष, रा. सालोड (हि). पडेगांव रोड, जि. वर्धा २) विनोद धनु राठोड, वय ३० वर्ष, रा. आर्णी रोड, वडगांव जि. यवतमाळ यांचे ताब्यातून १) एक ट्रक टिप्पर क्रमांक एम.एच. ३१ सी.वी. ७७५९ त्यात २५० फुट ओली रेती २) एक ट्रक टिप्पर क्रमांक एम.एच. २९ ए.एन. ४४६६ त्यात २५० फुट ओली रेती, तसेच मौजा डोरला रेती घाटमधुन रेतीची अवैधरितया वाहतुक करणारे ट्रॅक्टर चालक १) रोशन संजय सराटे, वय २५ वर्ष, २) अमोल शंकर मोहिजे वय ३२ वर्ष, दोन्ही रा. घोची, हिंगणघाट, जिल्हा वर्षा, ३) मालक कृष्णा नरूले रा. घोची वडणेर, वर्धा यांना ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यातील १) एक महींद्रा कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एम. एच. ३२ ए.एच. ५२३०, व विना क्रमांकाजी ट्रॉली, ट्रॉलीमध्ये १०० फुट रेती २) एक महींद्रा कंपनीचा ट्रैक्टर ज्याचा क्रमांक एम.एच. ३२ ए.एच. ९५१९ व एक विना क्रमांकाजी ट्रॉली, ट्रॉलीमध्ये अंदाजे ५० फुट रेती असा एकुण जु.कि. ३५,३९,०००/- रू. बा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीतांनी संगणमाताने शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या रेती घाट येथुन आर्थीक फायदयाकरीता रेतीची अवैद्य वाहतुक करीत मिळुन आल्याने नमुद सर्व आरोपीतांविरूध्द पोलीस स्टेशन हिंगणघाट व पोलीस स्टेशन वडणेर येथे कलम ३०३(२), भारतीय न्याय संहिता २०२३ सह कलम ३(१) १८१, १३०/१७७ मोवाका कायद्यान्वये ०२ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सदरची कारवाई मा. श्री. अनुराग जैन, पोलीस अधीक्षक वर्षा, मा. डॉ. श्री. सागर कवडे, अपर पोलीस अधिक्षक, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री विनोद चौधरी, पोउपनि श्री. उमाकांत राठोड, पोलीस अंमलदार गजानन लामसे, रितेश शर्मा, गोपाल वावणकर, मंगेश आदे, दिपक साठे, मर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वर्षा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये