ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘क्रांतीयोद्धा जननायक बिरसा मुंडा’ ग्रंथाचे शनिवारी प्रकाशन

चांदा ब्लास्ट

भगवान बिरसा मुंडा शहिद दिनानिमित्त उलगुलान साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूर आणि बिरसा मुंडा बचत गट, मूलच्या वतीने लेखक प्रब्रह्मानंद मडावी लिखित ‘क्रांतीयोद्धा जननायक बिरसा मुंडा’या चौथ्या ग्रंथाचे शनिवारी १० जून २०२३ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा मध्यवर्ती बँक सभागृहात प्रकाशन होणार आहे. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध विचारवंत डॉ. नीलकांत कुलसंगे तर प्रकाशन समाजसेविका डॉ. अभिलाषा बेहरे-गावतुरे आणि भाष्यकार म्हणून ज्येष्ठ लेखक डॉ. इसादास भडके, अभ्यासक राजेश मडावी, प्रा. डॉ. रामचंद्र वासेकर, चित्रकार भारत सलाम, कवी नरेशकुमार बोरीकर उपस्थित राहतील. दुसऱ्या सत्रात लेखिका डॉ. पद्मरेखा धनकर यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होईल. यामध्ये डॉ. किशोर कवठे, धनंजय साळवे, प्रा. संदिप गायकवाड, प्रदीप देशमुख, विजय वाटेकर, अविनाश पोईनकर, नरेंद्र कन्नाके, मालती सेमले, गीता देव्हारे, धर्मेंद्र कन्नाके, प्रविण आडेकर, अर्जुमनबानो शेख, सुधाकर कन्नाके, परमानंद जेंगठे, सुरेंद्र इंगळे, संतोषकुमार उईके सहभागी होणार आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये