ग्रामीण वार्तामहाराष्ट्र

भारी येथे शासन आपल्या दारी उपक्रमाला सुरूवात

आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :– अतिदुर्गम, आदिवासी बहुल अशा जिवती तालुक्यातील मौजा भारी येथे महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी उपक्रमाची मोठ्या थाटामाटात सुरूवात करण्यात आली. या उपक्रमांतर्गत विविध शासकीय योजने अंतर्गत जिवती तालुक्यातील प्रात्र लाभार्थीना विविध योजनांतून मिळणाऱ्या शासकीय प्रमाणपत्रांचे वितरण लोकप्रिय आमदार सुभाष धोटे आणि मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. तसेच विविध शासकीय विभागाअंतर्गत सुरू असलेल्या योजनांची माहिती देण्यात आली. पात्र लाभार्थीना धनादेशाचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जाॅन्सान, प्रकल्प अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी चंद्रपूर मा. एस. मुरुगनंथम, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसिलदार दिपक वजाळे, सरपंच लक्ष्मीकांत कोटनाके, माजी जि. प. सदस्य भीमराव पा. मडावी यांचा हस्ते शासकीय योजनेअंतर्गत मिळणाऱ्या शासकीय मदतीच्या धनादेशाचे व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
सर्वसामान्य नागरिकांना शासनाचा विविध योजनांचा लाभ कमीत कमी कालावधी देण्या करिता शासकीय योजना लोकाभिमुख करून त्याची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी शासन आपल्या दारी या उपक्रमाव्दारे जिवती तालुक्यातील पात्र लाभार्थीना, आत्महत्या करणाऱ्या शेतकरी कुटूंबाला धनादेश, रेशन कार्ड, आयुष्मान कार्ड, संजय गांधी व श्रावण बाळ योजन, जेष्ठ नागरीक कार्ड, रहिवाशी व उत्पन्नाचे दाखले, जातीचे प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्रे आणि विवीध योजनेचे धनादेश वितरित करण्यात आले.
या प्रसंगी कार्यक्रमचे प्रास्ताविक तहसिलदार दीपक वजाळे, सूत्रसंचालन अरुणा कवठे तर आभार उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांनी मानले. कार्यक्रमाला विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये