ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देशी-विदेशी दारू मालाची वाहतुक व विक्री करणा-या आरोपीतांवर धडक कार्यवाही

एकूण 11 लाख 1 हजारांवर मुद्देमाल जप्त ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

     दि 30/07/24 रोजी स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा चे पथक पोलीस स्टेशन हिंगणघाट परीसरात अवैध धंद्यावर कार्यवाही करणेकरीता पेट्रोलिंग करीत असतांना, मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे महावीर वार्ड हिंगणघाट येथे एका पांढ-या रंगाच्या XUV 500 कार. क्र. MH 43 AR 5153 यावर सापळा रचुन दारूबंदीबाबत प्रो.रेड करून कार्यवाही केली असताना, सदर कारमध्ये 06 खरर्ड्याचे खोक्यात देशी-विदेशी दारूचा माल मिळुन आल्याने, सदर दारूचा मुद्देमाल व दारू वाहतुकीकरीता वापरण्यात आलेल्या कारसह जु.कि. 11,01,600 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपी नामे 1) अनिल पावडे रा. महावीर वार्ड हिंगणघाट 2) भारत चद्रकांत उंन्डे, वय 34 वर्ष, रा. रंगारी वार्ड हिंगणघाट, 3) दिक्षीत उर्फ घुटली मिलींद भगत, वय 25 वर्ष, रा. संत तुकाडोजी वार्ड हिंगणघाट, 4) राजु अन्ना कंदुकुरी देशी दारू दुकानदार रा. चिन्नोरा तह. वरोरा 5) आकाश उर्फ टिन्या गवळी रा. संत कबीर वार्ड हिंगणघाट यांच्यावर पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

  सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. नुरूल हसन वर्धा अपर पोलीस अधिक्षक श्री. डॉ सागर कवडे सा., यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. संजय गायकवाड सा. यांचे निर्देशाप्रमाणे, पो.उप.नी. उमाकांत राठोड, मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, संजय बोगा, अभिषेक नाईक, विनोद कापसे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये