ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
देऊळगाव राजा येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना व जनसेवा सामाजिक संघटना देऊळगाव राजा च्या वतीने विरंगुळा भवन या ठिकाणी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,या प्रसंगी श्री गोविंदराव अहिरे, श्री मापारी मामा, श्री अरुण सपाटे, श्री रमेश नरोडे, प्रा. श्री अशोक डोईफोडे, श्री गोविंद बोरकर श्री वाळेकर व श्री प्रकाश अहिरे उपस्थित होते.
याप्रसंगी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यावरउपस्थित मान्यवरांनी प्रकाश टाकला .