ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मारडा येथील आरोग्य शिबिरात २१० ग्रामस्थांची तपासणी व औषध वितरण 

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील शेवटच्या टोकावरील मारडा या गावी रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर तर्फे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरात २१० जणांची आरोग्य तपासणी करून औषधींचे वितरण करण्यात आले.

मारडा येथील या आरोग्य शिबिराचे प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ.आसावरी देवतळे होत्या. तर शिबिराला रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरचे अध्यक्ष अजय पालारपवार, सचिव मिलिंद बोडखे, रोटे. राजेश गन्यारपवार, रोटे. नंदाताई अलुरवार, रोटे. शितल गौरकार उपस्थित होते. सर्वप्रथम मारडा गावातील महिला व पुरूषांना आरोग्य विषयक माहिती डॉ.आसावरी देवतळे व डॉ.सोनाली कपूर यांनी दिली. त्यानंतर शिबिरात सहभागी २१० ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबराचा लाभ घेतलेल्या सर्वांनाच औषधीचे वितरण रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरच्या वतीने करण्यात आले. यावेळी गरोदर मातांची तपासणी केली. या शिबिरा करीता मारडा येथील समाजसेवीका संगीता धोटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी तेकरीता भरपूर परिश्रम घेतले.

त्याचप्रमाणे सदर शिबीरात रूग्णांची रक्त तपासणी, मधुमेह तपासणी तसेच इतरही तपासण्या डॉ.आसावरी देवतळे यांच्या सहकाऱ्यांनी केल्या. या शिबिरात रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरचे सहकार्याने सर्वांना सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन देण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये