ताज्या घडामोडी

आर्थिका उपाध्येची उंच उडी – दिल्लीतील गणराज्य दिन परेड पुर्व प्रशिक्षणासाठी निवड

गोंडवाना विद्यापीठातुन परेडपूर्व शिबिरात निवड होणारी एकमेव विद्यार्थिनी - जळगावातील शिबिरातुन निवड झाल्यास होणार दिल्लीला रवाना

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

स्वतंत्र भारताच्या इतिहासात गणराज्य दिनाच्या निमित्ताने राज पथावर (कर्तव्य पथ) होणाऱ्या गणराज्य दिन परेडला (#RD Parade) अत्यंत महत्व असुन ह्या परेडमध्ये निवड व्हावी अशी भुदळ (#Army), नौदल (#Navy) तसेच वायुदलातील (#Air Force) सर्वच सैनिकांची तसेच राष्ट्र निर्माणासाठी व राष्ट्राच्या सेवेसाठी सशस्त्र दलात सामील होण्याची प्रेरणा त्याचप्रमाणे प्रशिक्षण शालेय व महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांना देणारी राष्ट्रीय छात्र सेना म्हणजेच एन. सी. सी. (#NCC) होय तर विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवा तसेच सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे अद्भुत करत राष्ट्रीय सेवा योजनेच्या (#NSS) माध्यमातून केल्या जाते. गणराज्य दिनाच्या निमित्याने राजपथावर (कर्तव्य पथ) राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांनाही परेड मधे सहभागी होण्याचा मान मिळत असतो हे विशेष.

अत्यंत कठोर प्रशिक्षण पूर्ण करून पथसंचलनच्या निकषांत बसणे व गणराज्य दिनाच्या परेड मधे निवड होणे ही गौरवाची बाब असुन नंतर ह्या परेडमधे सामील होऊन देशाच्या राष्ट्रपतींना तसेच देशाचा सर्वोच्च मानबिंदू असलेल्या तिरंगा ध्वजाला सलामी देणे हा अत्यंत दुर्मिळ व अभिमानाचा क्षण अनुभवणे म्हणजेच भारतीयत्वाचा अत्युच्च सन्मान व जीवनाचे सार्थक होणे समजल्या जाते.

ह्याच अत्युच्च सन्मानाचे भागिदार होण्याची सुवर्णसंधी घुग्गुस येथिल शिक्षक संजय उपाध्ये ह्यांची सुकन्या आर्थिका हिला प्राप्त झाली असुन संगणक विज्ञान क्षेत्रात जनता महाविद्यालयात पदवीच्या अंतिम वर्षाला शिकत असलेल्या आर्थिका हीची निवड जळगाव येथिल कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात गणराज्य दिनाच्या परेडसाठी आयोजित पूर्व प्रशिक्षण शिबिरासाठी झाली असुन 12 ते 21 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या ह्या शिबिरात राज्यातील 74 विद्यार्थिनींसह सहभागी होण्यासाठी आर्थिका रवाना होत आहे. शिबिराअंती 14 यशस्वी विद्यार्थी दिल्ली येथिल गणराज्य दिनाच्या निमित्याने राज पथावर (कर्तव्य पथ) होणाऱ्या संचलनात सहभागी होतील.

विशेष बाब म्हणजे गोंडवाना विद्यापीठामधुन (#Gondwana University) गणराज्य दिन परेड शिबिरासाठी निवड झालेली ती एकमेव विद्यार्थिनी असुन घुग्गुस येथिल देखिल ती पहिली विद्यार्थिनी ठरली आहे हे विशेष. ह्या शिबिरात यशस्वी प्रशिक्षण प्राप्त करून आर्थिका दिल्ली येथिल गणराज्य दिन परेड मधे विद्यापीठाचे पर्यायाने चंद्रपूर जिल्हा व घुग्गुसचे प्रतिनिधित्व करण्यास सज्ज आहे. हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पुर्ण करण्याचा विश्वास आर्थिकाने चांदा ब्लास्ट सोबत बोलताना व्यक्त केला असुन तिने ह्या यशाचे श्रेय आई वडिलांची खंबिर साथ व प्रोत्साहन, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रशिक्षक तसेच शाळा व महाविद्यालयाच्या शिक्षकांना दिले असुन चांदा ब्लास्ट परिवार देखिल तिच्या यशाचे साक्षिदार होण्यात उत्सुक आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये