ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ज्युनिअर आय.ए.एस. स्पर्धेत स्कॉलर्स सर्च अकॅडेमीच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

कोरपणा :- संस्कार प्रकाशन लातूर यांच्या वतीने जानेवारी २४ मध्ये घेण्यात आलेल्या ज्युनिअर आयएएस कॉम्पिटिशन या स्वंयमुल्यमापन वर आधारित स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात स्कॉलर्स सर्च अकॅडमी कोरपणा येथील इयत्ता सातवी चा विद्यार्थी यश सुरेश मोहितकर इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी अर्पिता किशोर आत्राम तसेच इयत्ता तिसरीचा विद्यार्थी हिरण्य ट्रिंकल लोडे ट्रॉफी व विशेष प्रमाणपत्र चे मानकरी ठरले.

    ज्युनियर आयएएस ही स्पर्धा परीक्षा दुसरी ते सातवी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक स्तरापासून तयारीसाठी तसेच विद्यार्थिंचा भविष्याचा सकारात्मक विचार करुण आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी संबधित वर्ग अभ्यासक्रमावर आधारित वस्तुनिष्ठ परीक्षा दरवर्षी घेतली जाते. गेल्या दहा वर्षापासून प्रकाशना द्वारा राज्यातील बाविस जिल्हात आयोजित केल्या जात असुन.ही एक फक्त परीक्षा नसून एक मिशन आहे. या परीक्षेच्या माध्यमातून भविष्यात येणाऱ्या शिष्यवृत्ति,नीट,जेईई,एमपीएससी ,यूपीएससी आयआयटी व ईतर स्पर्धा परीक्षांसाठी स्वतःची चाचणी घेण्यास पाया मजबूत करण्यास विद्यार्थ्यांना मदत होते. अगदी बालवयापासूनच प्रज्ञावान विद्यार्थी शोधने, त्यांना प्रोत्साहन देने त्याच्यातील गुणात्मक क्षमतेचा विकास करन्याचे काम या माध्यमातून होते.स्कॉलर्स सर्च एकेडमी येथे आयोजित कार्यक्रम

प्रसंगी सहभागी झालेल्या तीस विद्यार्थ्यांचे सहभाग प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन प्राचार्य श्री राहुल उलमाले आणि उप प्राचार्या करिष्मा साटोणे यांनी अभिनंदन केले व मार्गदर्शनातुन विद्यार्थ्यांना आजच्या स्पर्धात्मक युगात शालेय शिक्षनात स्पर्धा परीक्षांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे हे पटवून दिले.

प्रसंगी शिक्षक वृंद सारिका फुलकर, श्याम वाघमारे, प्रणाली खडसे, दिपाली लिंगजवार, ललित वाघमारे, पूजा थेरे, दिव्या शेंडे, प्रांजली मोहितकर, हर्षल तडस, उज्वला वडसकर, उज्वला जाधव, निहारिका हंसकर, गायत्री रागीट, संकेत साखरकर, छबन पेरके उपस्थित होते. संयोजक माजी प्राचार्य संजय ठावरी , संस्थापक इंजी.दिलीप झाडे, सौ कुंदा झाडे यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये