ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसचा गडचांदूर निषेध रॅलीला पाठिंबा – वैद्यकीय अधिकारी बदली प्रकरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

     आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवेचा ध्यास घेऊन आदिवासी समाजाचे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उच्चशिक्षित ध्येय गाठून स्वतःच्या स्वार्थाचा आर्थिक व प्रगती हेतू न ठेवता आपले सेवा व कर्तव्य पार पाडणाऱ्या डॉक्टर प्रवीण यांनी कोविळकाळात राबविलेले उपक्रम सामाजिक चळवळ हे फक्त आदिवासी म्हणून नव्हे तर सर्व समाजासाठी शासनाचे कर्तव्य पार पाडून दोन वर्ष समाजासाठी राबवलेली सेवा उपक्रम ज्यामुळे हजारो आर्थिक कमकुवत कोरोना काळात भयभीत व दहशतीमध्ये असलेल्या अनेक समाजाच्या परिवारांना ठिकठिकाणी आरोग्य शिबिरे मार्गदर्शन ऑक्सिजन औषध कमी खर्चात कोणताही आर्थिक लाभाचा हेतू न ठेवता लोकांची सेवा केली आहे.

आम्ही दुर्गम आदिवासी भागात डॉ येरमेयांचे कार्य उघड्या डोळ्यांनी बघितले त्यांचा सेवा कार्याचा व लोकांना आपुलकीने सहकार्यकरण्याची कार्यशैली आम्ही बघितली आहे हिरहिरीने या भागातवैद्यकीय सेवा मदत देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सेवेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करून बदलीचे षडयंत्र हा प्रकार निंदनीय असून प्रशासनाने बदली बद्दल घेतलेला निर्णय हा जनभावनेला ठेच पोहोचवणार असल्यामुळे व कायदेशीर सेवा देत असताना हा राजकीय षडयंत्र असल्याने प्रशासनाने लोकांच्या भावनेचा आदर करून बदली रद्द करावी व प्रशासनिक कालावधी देखील झाला नसताना कोणत्या कारणासाठी हा निर्णय घेतला हे लोकांना खपलेला नाही हि बाब निंदनीय असून आदिवासी बांधवांनी आयोजित केलेल्या गडचांदूर येथील भव्य निषेध रॅलीला राष्ट्रवादी काँग्रेस जन सत्याग्रह संघटना जाहीर पाठिंबा देत कार्यकर्त्यांनी पाच सप्टेंबरच्या आयोजित रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे स आबिद अली धनराज जिवने विकास टेकाम विनोद जुमडे महादेव पेदोर भाऊराव कन्नाके मारोती कोडापे रमेश डाखरे यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये