ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजने’चे जिल्ह्यात ३९३६७ अर्ज प्राप्त

अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत

चांदा ब्लास्ट

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भुमिका मजबूत करण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिला / मुलींना दरमहा १५०० रुपये देण्यात येणार आहे. या योजनेचे जिल्ह्यात ऑफलाइन आणि ऑनलाईन मिळून एकूण ३९ हजार ३६७ अर्ज प्राप्त झाले आहेत. यात वैयक्तिक रित्या भरलेल्या व इतर संस्थांनी भरलेल्या अर्जाचा समावेश नाही. अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ऑफलाइन पद्धतीने २२,४७६ तर ऑनलाईन पद्धतीने १६८९१ असे एकूण ३९ हजार ३६७ अर्ज प्राप्त झाले आहेत. यात शहरी अंगणवाडी केंद्रात (ऑफलाईन ५५२९, ऑनलाईन ३८५९ एकूण ९३८८ अर्ज), ग्रामीण अंगणवाडी केंद्रात (ऑफलाईन १४९३१, ऑनलाईन ११९९४ एकूण २६९२५ अर्ज), चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सुविधा केंद्रात (ऑफलाईन १४२९, ऑनलाईन ५३५ एकूण १९६४ अर्ज), जिल्ह्यातील नगरपालिका / नगरपंचायत क्षेत्रात असलेल्या सुविधा केंद्रात (ऑफलाईन ११७, ऑनलाईन ९० एकूण २०७ अर्ज) तर जिल्ह्यातील विविध सेतू केंद्रामध्ये (ऑफलाईन ४७०, ऑनलाईन ४१३ एकूण ८८३ अर्ज) अर्ज प्राप्त झाले आहेत. यात वैयक्तिकरित्या महिलांनी भरलेले व इतर सामाजिक संस्था व राजकीय पक्षांनी भरलेल्या अर्जाचा समावेश करण्यात आला नाही.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये