पोलीस ठाणे वर्धा शहर येथील ५४ ग्रॅम एम.डी. ची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
अपराध क्रमांक ६०२/२०२५ कलम ८ (क), २२ (ब), २९ एन.डी.पी.एस. अॅक्ट आरोपी दानेशखॉन मक्सुदखॉन पठाण, वय २४ वर्ष, रा. वार्ड नं. २६, पुलफैल वर्धा,जप्त माल एका प्लास्टिकच्या छोटया पन्नीत ५३.९८ ग्रॅम एम.डी. (मॅफीड्रोन) कि. २,४४,९१०/- चा पोलीस ठाणे वर्धा शहर येथील डी. बी. पथकाला मिळालेल्या विश्वसनिय बातमीदार द्वारे माहीती मिळाली की, एक इसम मुंबई येथुन एम.डी. घेवुन येत आहे. सदर माहीती वरून रेल्वे स्टेशन परीसरात सापळा रचला. संशईत इसम यास रेल्वे स्टेशन समोरील आशियानाचे समोर रोडवर ताब्यात घेण्यात आले. त्याची कायदेशीर अंगझडती घेतली असता त्याचे पॅन्टचे खिश्यात एका प्लास्टिकच्या पन्नीत ५३.९८ ग्रॅम एम.डी. (मॅफीड्रोन कि. २,४४,९१०/- चा माल मिळुन आला. तसेच त्याचेकडुन वापरता मोबाईल कि. २०००/- रू चा जप्त करण्यात आला.
सदर माल हा मुंबई येथुन एका व्यक्तीकडुन घेतल्याचे सांगत आहे. सदर माल हा कोणत्या व्यक्तीकडे विक्री करीता देण्याकरीता आणला होता याबाबत सविस्तर तपास करण्यात येत आहे. त्याकरीता आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात येत आहे.
सदर कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन, मा. श्री. सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री. प्रमोद मकेश्वर, यांचे निर्देशनानुसार, मा. पोलीस निरीक्षक, पराग पोटे, ठाणेदार पोलीस ठाणे वर्धा शहर, यांचे मार्गदर्शनात पो.उपनि. शरद गायकवाड, डि.बी. ‘पथक, पो.हवा. शैलेश चाफलेकर, विजय पंचटिके, किशोर पाटील, पोलीस नाईक, मरेंद्र कांबळे, पोलीस शिपाई वैभव जाधव, श्रावण पवार, शिवा डोईफोडे, भुषण चव्हाण, पोलीस ठाणे वर्धा शहर यांनी केली आहे,