ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धानोली येथे तालुका स्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

        पंचायत समिती कोरपणा द्वारा आयोजित तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा दिनांक 15 जुलै ला माध्यमिक आश्रम शाळा धानोली येथे आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय लोकेश खंडारे शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती कोरपणा हे होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय गंगशेट्टीवार सर मुख्याध्यापक माध्यमिक आश्रम शाळा धानोली हे होते प्रमुख अतिथी म्हणून माननीय पंढरी मुसळे केंद्रप्रमुख केंद्र आवाळपूर, गडचांदूर हे होते

           विज्ञान मेळाव्याला परीक्षक म्हणून माननीय दीक्षा बावणे मॅडम शिवाजी जुनिअर कॉलेज नांदा फाटा तसेच श्री मेहरकुरे उच्च माध्यमिक शिक्षक सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर व श्री करमरकर सर माध्यमिक आश्रम शाळा धानोली यांनी परीक्षकाचे काम पाहिले

   या स्पर्धे करता एकूण 14 शाळा शाळा सहभागी झाल्या

प्रथम क्रमांक: रोहित मारोती ताजणे

 महात्मा गांधीं विद्यालय नांदगाव सूर्याचा

द्वितीय क्रमांक: कु तनवी श्रीहरी चौधरी जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव

तृतीय क्रमांक: आरोह शैजु नायर आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल आवाळपुर

         वरील विजेत्या विद्यार्थ्यांना माध्यमिक आश्रम शाळा धानोली च्या वतीने बक्षीस देवून गौरवण्यात

          कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. गंगशेट्टिवार सर व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

           विज्ञान मेळाव्यात सहभागी विद्यार्थी व शिक्षका करीता शाळेच्या वतीने अल्पोपहार चहा ची व्यवस्था करण्यात आली

          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. आंबेकर सर यांनी केले तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन श्री विकास भंडारवार साधन व्यक्ती यांनी केले.

           सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना करिता मा. सचिन कुमार मालवी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कोरपना यांच्या मार्गदर्शनाखाली साधन व्यक्ती गटसाधन केंद्र कोरपना यांनी काम पाहिले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये