ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जंगली डुकराच्या हल्ल्यात 1 मृत तर 6 जखमी

जखमीमध्ये 3 शाळकरी मुलींचा समावेश ; सावली वनपरिक्षेत्रातील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

सावली वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या चकपिरंजी बिटामध्ये जंगली डुकराने हल्ला करुन 7 जणांना जखमी केल्याची घटना आज दि.16 रोजी सकाळी 11.30 च्या सुमारास घडली. कवठी येथील कु.तनु भास्कर नायबनकर (वय 18), कू.केशवी लालाजी पाल (18) कु.दुर्गा दिलीप दहेलकर (18) या शाळकरी मुलींचा समावेश आहे. तर सावली येथील स्वप्नील सुरेश आकुलवार (38) सुरेश आकुलवार (65) निर्मला सुरेश आकुलवार (50) यांचा जखमीमध्ये समावेश असुन आनंदराव चौधरी (55) यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. तर तनु भास्कर नायबनकर व सुरेश आकुलवार हे गंभीर जखमी आहेत.

दिवसेंदिवस सावली परिसरात जंगली श्वापदाचा वावर मोठया प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे शेतातील कामे करण्यास मजुर मिळत नसल्याने अनेक शेतकरी स्वत: शेतीमध्ये काम करतांनाचे चित्र आहे. जंगली श्वापदाच्या दहशतीत शेतकऱ्यांना शेतीची कामे करावी लागत आहेत. आनंदराव चौधरी हे शेतकरी आपल्या शेतात काम करीत असतांना जंगली डुकराने त्यांच्यावर हल्ला करुन गंभीर जखमी केले. त्यांना सावली येथील ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. प्राथमिक उपचार करुन पुढील उपचाराकरीता गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत असतांना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. कवठी येथुन शिक्षणासाठी सावली येथे येत असतांना सावली तुकुम जवळ जंगली डुकराने 3 शाळकरी मुलीवर हल्ला करुन जखमी केले आहे.

तर सुरेश आकुलवार, निर्मला आकुलवार व स्वप्नील आकुलवार हे घरीच बसुन असतांना घरामध्ये जंगली डुकराने हल्ला करुन जखमी केले, यात सुरेश आकुलवार गंभीर जखमी असल्याने त्यांना गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सर्व जमखीवर हल्ला करणारा एकच जंगली डुक्कर असल्याचे बोलले जात आहे.

    हल्याची माहिती होताच तात्काळ वनविभागाच्या टिमला पाचारण करण्यात आले असुन हल्ला केलेल्या जंगली डुकराचा लवकरच बंदोबस्त करण्यात येईल.

– विनोद धुर्वे, वनपरिक्षेत्र अधिकारी सावली

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये