ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निधन वार्ता – ज्योती दानव यांचे अल्पशा आजाराने निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

      शहरातील विजासन येथील सहकारी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष बबनराव दानव यांची सून तथा धनोजे कुणबी समाज संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते जगन दानव यांची पत्नी ज्योती जगन दानव यांचा अल्पशा आजाराने दिनांक 14 रोज रविवारला रात्रै नऊ वाजता मृत्यू झाला. मृत्यू समयी त्या 39 वर्षाच्या होत्या.त्याच्या पश्चात एक मुलगी, दोन मुले,पती व बराच मोठा आप्त परिवार आहे.

शहरातील पिंडोनी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी एडवोकेट पुरुषोत्तम सातपुते यांच्या अध्यक्षतेत शोकसभा घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर,शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे,पांडुरंग टोंगे, भास्कर ताजने,सुधीर सातपुते, प्रफुल चटकी, संतोष आमने,कुंदन पाटील आदिसह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये