ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फर्जी कर्मचारी लाखो-करोडोंचे घोटाळे असे म्हणणे संयुक्तिक नाही

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राची स्पष्टोक्ती

चांदा ब्लास्ट

      “चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र येथे फर्जी कर्मचारी- लाखो-करोडोंचे घोटाळे” या आशयाच्या बातम्या विविध वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित झाल्याचे निदर्शनास आले. प्रकाशित बातम्यांच्या बातमीच्या अनुषंगाने चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातर्फे खालील प्रमाणे खुलासा देण्यात येत आहे.

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र हे सध्यस्थितीत २९२० MW विदयुत निर्मिती करणारे केंद्र आहे. या विद्युत निर्मिती केंद्रामध्ये २१० मेवें चे २ संच व ५०० मेवें चे ५ संच कार्यान्वित आहेत. या संचांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी विविध कंत्राट काढले जातात. या सर्व कंत्राटांअतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी कामगारांना नियमानुसार गेटपास अदा करण्यात येतात. तसेच सर्व कंत्राटी कामगारांचे बायोमेट्रिक रेजिस्ट्रेशन करून त्यांची हजेरी बायोमेट्रिक प्रणालीमध्ये लावण्यात येते. त्यामुळे कोणत्याही वास्तविकतेशिवाय व शहानिशा न करता “फर्जी कर्मचाऱ्यांची संख्या दाखवून कर्मचाऱ्याला मिळत असलेले वेतन कंत्राटदार घरबसल्या घेत आहे, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र येथे फर्जी कर्मचारी – लाखो- करोडोंचे घोटाळे” असे म्हणने संयुक्तिक वाटत नाही.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये