ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कार व ट्रकच्या अपघातात दोन जण जागीच ठार तर तीन जखमी

लग्न सोहळा आटपून येताना काळाचा घाला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

ब्रम्हपुरी :- ब्रम्हपुरी नागपुर रोडवर आज पहाटेच्या 4 दरम्यान कार व ट्रक मध्ये जोरदार धडक झाल्याने कार मधील दोन जण घटनास्थळी मरण पावले तर तीन जण जखमी आहेत

सविस्तर जितेंद्र परसवाणी वय 45 हे आपल्या परिवारासोबत नागपूरवरून लग्न समारंभ आटपून आपल्या कार क्र MH 33V 9138 ने स्वगावी वडसा येथे निघाले असता ब्रह्मपुरी जवळ माहेर फाट्याजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक क्रं MH 40CT0574 समोरासमोर धडक दिल्याने त्यांच्या परिवारातील त्यांची पत्नी महेक परसवाणी वय 42 व त्यांचा भाऊ दीलीप परसवानी वय 55 हे हे घटनास्थळी मरण पावले तर त्यांचा मुलगा गौरव परसवानी वय 17 वर्ष उदय परसवानी वय 10 वर्ष व जितेंद्र परसवानी वय 55 वर्ष हे गंभीर स्वरूपात जखमी झाले त्यांना ब्रह्मपुरी येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुढील तपासत पोलीस निरीक्षक पोलीस अनिल जित्तावार यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये