ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कौशल्याबाई काबरा यांचे मरणोत्तर नेत्रदान.
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी राजकुमार काबरा यांच्या मातोश्री श्रीमती कौशल्याबाई काबरा यांचे वृध्दपकाळाने वयाच्या 87 व्या वर्षी दिनांक 5 जुलै रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला, जालना येथील गणपती नेत्रालयाच्या चमू ने येऊन मरणोत्तर नेत्रदान करुण घेतले यावेळी जायंट्स परिवाराचे डॉक्टर अशोक काबरा, पुरुषोत्तम धन्नावत, जुगल किशोर हरकुट यांनी सहकार्य केले त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबात 1 मुलगा,2 मुली,नातवंडे असा आप्त परिवार आहे.



