वर्धा जिल्हा पोलीस तर्फे संगीत महोत्सव स्वस्तरंग 2025

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
‘स्वरतरंग २०२५ संगीत आणि हास्याचा दिव्य संयोगी वर्धा जिल्हा पोलीस कल्याण निधीसाठी अभूतपूर्व सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमों
वर्धा जिल्ह्यातील पोलीस कल्याण निधी हेतूने स्वरतरंग २०२५’ या अलौकिक सांगीतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २२ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६:०० वाजता, “स्वावलंबी शाळेच्या रम्य प्रांगणात, रामनगर, वर्धा येथे भव्यपणे पार पडणार आहे. मनोरंजनाचा कार्यक्रम नसून, समाजाच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या पोलीस कुटुंबांसाठी आपल्या सहानुभूतीचे साक्षात्कार आहे. प्रत्येक तिकिटातून मिळणारा निधी हा त्यांच्या जीवनातील संघर्षांना सहाय्यभूत ठरेल. येथे प्रत्येक सुर आणि प्रत्येक हसू, समाजसेवेचा संदेश देतो. चला, एकत्र येऊन कर्याच्या सांस्कृतिक विरासतीला चेतना देऊ।
विशेष आकर्षण’
प्रख्यात गायक कैलाश खेर आणि त्यांच्या बैंड कैलासा यांची जादुई प्रस्तुती असेल. त्यांच्या मधुर आवाजातील गाण्यांनी संपूर्ण वातावरण संगीतमय होणार आहे.
हास्यरसिकांचा मराठी मैफिल
मराठी हास्य धमाल सह प्रख्यात कलाकार भारत गणेशपुरे, सागर कारंडे, हेमांगी कवी, जयंवत भालेराव, माया शिंदे, मेचना येरंडे आणि गौरव मोरे यांच्या उपस्थितीत हास्याचा गारया सोहळ्याला चार चांदणी लावणार आहे.
इतर अनेक प्रतिभावंत कलाकारांचा रसपूर्ण सहभाग.
कार्यक्रमाचे तपशील
उद्देश पोलीस कर्मचार्याच्या कल्याणासाठी निधी संकलन.
स्थान: स्वावलंबी शाळेचे प्रांगण, रामनगर (वर्धा).
वेळ २२ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६:०० वाजता,
तिकिट उपलब्ध सर्व पोलीस ठाणे
किमत ५००१०००, १५००
संपर्क: तिकिटांसाठी झटपट संपर्क करा 8888338354
आमंत्रणे सर्वांसाठी, संगीत आणि हास्याची अखंड वर्षाच।
चला, वर्धाच्या या सांस्कृतिक सौंदर्यात सहभागी व्हा आणि पोलीस सेवेतील अज्ञात नायकांना समर्थन था। संयोजक वर्धा जिल्हा पोलीस
संपर्क वर्धा ०७१२३-२३४५६७
वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन यांनी आवाहन केले की, वर्षा पोलीसातर्फे आयोजित ‘स्वस्तरंग २०२५’ अलौकिक सांगीतिक महोत्सवात सहभागी होऊन वर्धा पोलीस कल्याण निधी वृद्धिंगत करण्याकरीता सहकार्य करावे.