Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लेखी परीक्षेकरिता एकूण 206 उमेदवार पात्र

उमेदवाराची बायोमेट्रिक पद्धतीने तसेच काटेकोरपणे चेकिंग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा सावंगी मेघे मेडिकल कॉलेज या परीक्षा केंद्रावर आज दिनांक 7/7/2024 रोजी पार पडली सदर लेखी परीक्षेकरिता एकूण 206 उमेदवार पात्र ठरले होते त्यापैकी 203 उमेदवार परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी आले होते.

परीक्षा देण्यासाठी आलेल्या उमेदवाराची बायोमेट्रिक पद्धतीने तसेच काटेकोरपणे चेकिंग प्रिस्किंग करून त्यांना परीक्षा केंद्रात सोडण्यात आले होते. पोलीस भरती लेखी परीक्षा करिता 3 dysp, 14 pi, 39 Api/psi व 200 महिला व पुरुष पोलीस अंमलदार बंदोबस्तासाठी नेमण्यात आले होते.

संपूर्ण परीक्षा दरम्यान माननीय पोलीस अधीक्षक वर्धा व अपर पोलिस अधीक्षक वर्धा हे स्वतः हजर होते त्यांच्या सुपरव्हिजनमध्ये सदरची परीक्षा शांततेत पार पडली परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये