Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

वर्धा उपविभागीय पोलीस पथक यांनी आवळल्या दारू विक्रेताच्या मुसक्या

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 07.07.2024 रोजी उपविभागीय कार्यालयातील पोलीस पथक यांना गोपनिय माहीती वरून नागसेन नगर ते स्नेहल नगर सिमेंट रोडवरील धम्मकुटी बुध्द विहारा जवळ वर्धा येथे नाकेबंदी करीत असता त्या दरम्यान माहीती प्रमाणे एक पांढऱ्या रंगाची सुजुकी कंपनीची स्वीफ्ट डिजायर क्र एम. एच 32 ए.एस. 5985 ही नागसेन नगर कडुन येतांनी दिसली वरून त्यास पोलीसांनी हात देवुन थांबविण्या इशारा दिला असता ते न थांबता गाडी रिवर्स मारण्याचा प्रयत्न करीत असता त्यांची गाडी सिमेंट रोडचे खाली उतरली व गाडी फसल्या सारखी वाटल्याने वाहन चालविणारा व त्याचे बाजुला बसुन असनारा इसम नामे 1) आकाश रविजी गणविर रा. स्नेहल नगर, वर्धा 2) वैभव पाटील रा. इतवारा बजार वर्धा यांनी वाहनाचे दरवाजे उघडुन गल्लीतुन जंगली भागा कडे पसार झाले मौक्यावर आरोपीतांनी विदेशी दारूने भरलेली 1) एक पांढऱ्या रंगाची सुजुकी कंपनीची स्वीफ्ट डिजायर क्र एम. एच 32 ए.एस. 5985 अंदाजे किंमत 9,00,000/- रू त्या वाहनाचे डिक्कीत 2) 5 पुर्ण खरडर्याचे खोक्या मध्ये तसेच एका अध्या खरडर्याचे खोक्या मध्ये 180 एम.एल.च्या विदेशी दारूने भरून असलेल्या ऑफीसर चाईस कंपनिच्या 264 शिश्या 3) 2 पुर्ण खरडर्याचे खोक्या मध्ये 180 एम.एल.च्या विदेशी दारूने भरून असलेल्या ऑफीसर चाईस ब्लु कंपनिच्या 96 शिश्या 4) 1 पुर्ण खरडर्याचे खोक्या मध्ये 180 एम.एल.च्या विदेशी दारूने भरून असलेल्या ऑयकॉनिक व्हाईट कंपनिच्या 48 शिश्या 5) 1 पूर्ण खरडर्याचे खोक्या मध्ये 500 एम.एल.च्या बियर दारूने भरून असलेल्या टुबर्ग कंपनिच्या 24 टिन कॅन 6) 2 पुर्ण खरडर्याचे खोक्या मध्ये 650 एम.एल.च्या बियर दारूने भरून असलेल्या टुबर्ग कंपनिच्या 24 कॉचेची बॉटल असा एकुन जु. की. 10,48,800/- रू माल अवैध्यरित्या मिळुन आल्याने जप्तीपंचनामा प्रमाणे जप्त करण्यात आले

सदर दोन्ही पसार आरोपीतांचा शोध सुरू असुन ते मिळुन येताच सदर आरोपीतांनी विदेशी दारूचा माल कोठुन आनला या बाबत विचारपुस करून सदर गुन्हयात बार मालक यांना आरोपी बनविण्याची तजविज ठेवली आहे.

पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे पसार आरोपीतांविरूध्द 1) अपराध क्रमांक 1075/2024 कलम 65 अ ई, 77 अ, 83, म.दा.का. सहकलम 3 (1) 181,130/177 मो.वा.का. अन्वये नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो. स्टे. वर्धा शहर येथील पोलीस अधिकारी क्रर्मचारी करीत आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. नुरुल हसन सा, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री सागर कवडे सा, याचे विशेष मार्गदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा, श्री. प्रमोद के. मकेश्वर सा. यांचे सुचनेप्रमाणे पो.उप.नि. परवेज खॉन, उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाचे पो.हवा. अमर लाखे, पोलीस कर्मचारी मंगेश चावरे, पवन निलेकर, समीर शेख, यांनी यशस्वी रित्या पार पाडली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये