स्वाभीमान जपण्याकरीता स्वतःच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपी वडीलास आजीवन कारावासाची शिक्षा.व १५,०००/-रु. दंड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा येथील मा. श्री.व्ही.पी.आदोने सा. जिल्हा व सत्र न्यायाधीश,-०४ वर्धा यांनी आरोपी नामे विलास पांडुरंग ठाकरे वय ४७ वर्ष रा.हमदापूर वर्धा, जि. वर्धा यांस १)कलम ३०२ भादवि मध्ये आजीवन कारावास व १०,०००/-रु. दंड, व दंड न भरल्यास ०१ वर्षचे सश्रम कारावास २) कलम २०३ भादवि मध्ये ०२ वर्ष सश्रम कारावास व ५,०००/-रु.दंड, व दंड न भरल्यास ०३ महीण्याचे सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात आली.
हकिकत याप्रमाणे आहे की, यातील आरोपी विलास पांडुरंग ठाकरे वय ४७ वर्ष रा. हमदापुर याने त्याची मृत्तक मुलगी कु.प्रणाली ठाकरे हीचे प्रेम संबध एका मुला सोबत चालु होते. त्याप्रकरणाचा पो.स्टे. रामनगर (वर्धा) येथे गुन्हा नोंद आहे. या प्रेम प्रकरणाचे कारणावरुन आरोपीचे त्याचे मुलीसोबत नेहमी भांडण होत होते. आरोपी यास मुलीने जेवण वाढले असता आरोपीने मुलीस आंब्याचा रस का केला नाही या कारणावरुन वाद घातला व लाकडी रॅप्टर ने डोक्यावर मारुन जिवानीशी ठार केले. व स्वतःचे बचावासाठी त्याने डायल क्र.११२ वर मृतक हीने डोके पटकुन आत्महत्या केली आहे. असे सांगितल्याने व पोलीस तपासात सदर माहीती खोटी असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यामुळे अशा प्रकारे आरोपीने तपासाची दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला, तपासी अधिकारी यांनी याबाबत सखोल चौकशी करुन आरोपीने दिलेली माहीती ही दिशाभुल करण्यारी असल्याने त्यावर दखल घेवुन गुन्ह्याचा तपास तत्कालीन तपास अधिकारी पोनि/योगेश कामाले पो.स्टे. दहेगांव (गो.) सध्या नियुक्ती पो.स्टे. कळमेश्वर जि. नागपुर (ग्रा. ) यांनी केला व आरोपीने गुन्हा केल्याचा सबळ पुरावा उपलब्ध झाल्यामुळे अप क्र. ८३/२२ कलम ३०२,२०३ भादवि नुसार दोषारोप पत्र मा. न्यायालयात दाखल केले..
सरकारतर्फे अतीरिक्त सरकारी अभियोक्ता, श्री.एच.पी. रणदीवे यांनी सदर प्रकरणात सरकार तर्फे एकुण १२ (बारा) साक्षीदार तपासले त्यांना तत्कालीन पैरवी अधिकारी, (सेवानिवृत्त) पोउपनि/अनिल मोहोड, पोहवा/१२०५ शेखर पाटील व सफी/११३९ राजेश कंगाले यांनी साक्षदारांना मा. न्यायालयात हजर करून मोलाची कामगीरी बजावली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार ही मृतक मुलीची आई असुन सुध्दा घडलेल्या घटनेबाबत पतीची बाजु न घेता अभियोजन पक्षाचे समर्थनार्थ खंबीरपणे व तटस्थ पणे साक्ष दिली. घटनास्थळ व जप्तीचे पंच असलेल्या महीला साक्षीदार तसेच शेजारी महीला साक्षीदार आणि इतर साक्षीदारांनी अभियोजन पक्षाचे समर्थनीय साक्ष दिल्याने अभियोजन पक्ष, आरोपीने केलेल्या कृत्याचे फळ अपराधसिध्दते पर्यंत पोहचविण्यास मोलाची भुमीका पार पाडण्यास मोलाची मदत झाली. अतीरिक्त सरकारी अभियोक्ता, श्री.एच.पी. रणदीवे यांचा यशस्वी युक्तीवाद ग्राहय धरून मा. श्री.व्ही.पी.आदोने सा. तदर्थ अति.जिल्हा व सत्र न्यायाधीश, वर्धा यांनी आरोपीस दिनांक ०५/०७/२०२४ रोजी वरील प्रमाणे शिक्षा सुनावली.