ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

छावा संघटनेतर्फे विद्यार्थ्यांना परीक्षा पैड वाटप 

शिवजयंती निमित्त गरजू विद्यार्थ्यांसाठी उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 छत्रपती श्री.शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज नगरपरिषद हायस्कूलमध्ये शंभर गरजू विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी उपयोगी पॅड वितरण करण्यात आले.

 स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या अनुषंगाने अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष राजेजाधव यांनी पुढाकार घेऊन शाळेतील गरजू अशा शंभर विद्यार्थ्याना छत्रपतींची प्रतिमा असलेले परीक्षेचे पॅड वितरण करण्यात आले.

श्री शिवाजी हायस्कूलच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य संजय देशमुख होते. यावेळी व्हाईस ऑफ मीडिया जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष मुशीरखान कोटकर, महसूल विभागाचे किशोर खांडेभराड, तालुका पत्रकार संघाचे सचिव सुरज गुप्ता,प्रा.प्रल्हाद देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक करताना छावा चे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष राजेजाधव यांनी संघटनेचे सामाजिक कार्य विषद केले. यावेळी संभाजी नन्नावरे, शहराध्यक्ष राजू पंडित, संभाजी ब्रिगेडचे अमोल दंदाले, सागर सवडे, मुंशी भाई, संदीप वाघमारे, प्रीतम पाठमासे, नारायण म्हस्के, शुभम डोंगरे आदींची उपस्थिती होती.

यावेळी शाळेतील शंभर गरजू विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा असलेले परीक्षा पॅड वितरण करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये